9 ऑगस्टला 64MP कॅमेऱ्यासह Vivo Y53s स्मार्टफोन येणार भारतात; जाणून घ्या वैशिष्ट्ये
By सिद्धेश जाधव | Published: August 7, 2021 12:38 PM2021-08-07T12:38:26+5:302021-08-07T12:39:06+5:30
Vivo Y53s India Launch: 9 ऑगस्टला कंपनी भारतात Vivo Y53s स्मार्टफोन लाँच करणार आहे.
दोन दिवसांपूर्वी Vivo चा Vivo Y12G स्मार्टफोन भारतात सादर करण्यात आला होता. Vivo Y12G च्या एकमवे 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे. आता येत्या 9 ऑगस्टला कंपनी भारतात Vivo Y53s स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनच्या लाँच तारखेची माहिती मनीकंट्रोलने दिली आहे. Vivo Y53s च्या सीरिजमधील तिसरा फोन असेल. याआधी या सीरिजमध्ये Vivo Y53s 4G आणि Vivo Y53s 5G हे स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच झाले आहेत.
Vivo Y53s चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y53s स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.58 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. हा एक फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे, जो वाटरड्रॉप नॉचसह सादर करण्यात आला आहे. Vivo Y53s स्मार्टफोन मीडियाटेक Helio G85 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे. हा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजला सपोर्ट करतो, हा एकच व्हेरिएंट बाजारात आला आहे.
Vivo Y53s स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेऱ्याचे रिजोल्यूशन 64 मेगापिक्सल आहे. त्याचबरोबर 2 मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी Vivo Y53s मध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.
Vivo Y53s ची किंमत
Vivo Y53s स्मार्टफोनचा फक्त एकच मॉडेल भारतात सादर केला जाईल. या फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात येईल. समोर आलेल्या रिपोर्टनुसार या व्हेरिएंटची किंमत 22,990 रुपये असू शकते. हा फोन डीप सी ब्लू आणि फॅन्टास्टिक रेनबो अशा दोन रंगात विकत घेता येईल.