Vivo Y55s 5G: 6,000mAh च्या अवाढव्य बॅटरी आणि 8GB RAM सह लाँच झाला Vivo चा 5G Phone; जाणून घ्या किंमत
By सिद्धेश जाधव | Published: December 9, 2021 11:49 AM2021-12-09T11:49:16+5:302021-12-09T11:49:29+5:30
Vivo Y55s 5G: Vivo Y55s स्मार्टफोन सध्या चीनमध्ये 6,000mAh Battery, MediaTek Dimensity 700 SoC, 8GB RAM आणि 50MP Camera सह सादर करण्यात आला आहे.
VIVO नं आपल्या ‘वाय’ सीरिजचा विस्तार सुरूच ठेवला आहे. कंपनीनं यात आता नवीन 5G Phone सादर केला आहे. Vivo Y55s स्मार्टफोन सध्या चीनमध्ये 6,000mAh Battery, MediaTek Dimensity 700 SoC, 8GB RAM आणि 50MP Camera सह सादर करण्यात आला आहे. लवकरच विवो वाय55एस 5जी स्मार्टफोन भारतासह जगभरात सादर केला जाऊ शकतो.
Vivo Y55s 5G Phone चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y55s 5G Phone अँड्रॉइड 11 आधारित ओरिजनओएस 1.0 वर चालतो. या फोनला कंपनीनं मीडियाटेकच्या डिमेनसिटी 700 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर दिली आहे. त्याचबरोबर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजला मिळते. हा फोन विवोच्या रॅम वाढवणाऱ्या वर्चुअल रॅम टेक्नॉलॉजीसह येईल कि नाही हे अजून समजलं नाही.
विवो वाय55एस 5जी फोनमध्ये 6.58 इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50MP चा प्रायमरी सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा विवो फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
बेसिक कनेक्टिव्हिटीसह Vivo Y55s 5G मध्ये 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाईप सी पोर्ट मिळतो. सिक्योरिटी डिवाइसमध्ये साईड पॅनलवरील पॉवर बटनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. फोनमधील 6,000एमएएचची मोठी बॅटरी याची खासियत आहे. ही बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. या फोनची किंमत 1699 युआन आहे, जे सुमारे 20,000 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होतात.