8GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह Vivo Y72 5G होणार लाँच; 15 जुलैला होऊ शकतो भारतात सादर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 12:40 PM2021-07-06T12:40:30+5:302021-07-06T12:41:18+5:30

Vivo Y72 5G India Launch: Vivo Y72 5G मध्ये 8 जीबी रॅमसह 4 जीबी अतिरिक्त रॅम मिळेल, हा स्मार्टफोन 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत भारतात लाँच केला जाऊ शकतो.  

Vivo Y72 5G with 8GB RAM and 64MP camera will be launched; Can be presented in India on 15th July | 8GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह Vivo Y72 5G होणार लाँच; 15 जुलैला होऊ शकतो भारतात सादर 

8GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह Vivo Y72 5G होणार लाँच; 15 जुलैला होऊ शकतो भारतात सादर 

Next

Vivo भारतात आपल्या ‘वाय सीरिज’ मध्ये लवकरच नवीन स्मार्टफोन घेऊन येऊ शकते. हा स्मार्टफोन भारतात Vivo Y72 5G नावाने लाँच केला जाऊ शकतो, अशी माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन भारतात 15 जुलैला लाँच केला जाईल. विवो वाय72 5जी मार्चमध्ये थायलंडमध्ये लाँच केला गेला होता. 

Vivo Y72 5G स्मार्टफोन भारतात 15 जुलैला लाँच केला जाईल, अशी माहिती 91Mobiles ने दिली आहे. या रिपोर्टमध्ये टिप्सटर योगेशने शेयर केलेला पोस्टर दाखवण्यात आला आहे. या पोस्टरमधून या स्मार्टफोनच्या ऑप्शन आणि रियर डिजाईनची माहिती मिळते. तसेच हा फोन भारतात 1,500 रुपयांच्या कॅशबबॅक ऑफरसह सादर केली जाईल, असे देखील पोस्टरमध्ये सांगण्यात आले आहे. ही ऑफर HDFC, ICICI आणि Kotak Mahindra बँकेच्या कार्डधारकांना देण्यात येईल. टिप्सटरने दिलेल्या माहितीनुसार विवो वाय72 5जी भारतात 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होईल.  

Vivo Y72 5G चे स्पेसिफिकेशन्स 
Vivo Y72 5G मध्ये 20:9 आस्पेक्ट रेशियो आणि 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशनसह 6.58 इंचाचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा वीवो फोन अँड्रॉइड 11 आधारित फनटच ओएस 11 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी यात मीडियाटेक डायमनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. 

फोटोग्राफीसाठी Vivo Y72 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे. पावर बॅकअपसाठी Vivo Y72 5G मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.  

Web Title: Vivo Y72 5G with 8GB RAM and 64MP camera will be launched; Can be presented in India on 15th July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.