11GB रॅमसह येत आहे Vivo Y73 (2021), या महिन्यात लाँच होईल हा पावरफुल फोन
By सिद्धेश जाधव | Published: June 3, 2021 03:30 PM2021-06-03T15:30:13+5:302021-06-03T15:31:13+5:30
Vivo Y73 launch: Vivo Y73 (2021) जूनमध्ये भारतात लाँच होईल. बाजारात येण्यापूर्वीच या फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.
Vivo ‘वाय’ सीरीजचा विस्तार करणार आहे आणि या अंतर्गत Vivo Y73 (2021) नावाचा नवीन नावाने स्मार्टफोन लाँच केला जाईल. वीवो वाय73 2021 एडिशन एक मिडबजेट डिवायस असेल जो जूनमध्ये भारतीय बाजारात येईल, अशी चर्चा आहे. कंपनीने याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. परंतु एमएसपी वेबसाइटने फोन लॉन्च होण्यापूर्वीच Vivo Y73 (2021) चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. (Vivo Y73 2021 with MediaTek Helio G95 will come to India in June)
Vivo Y73 (2021) चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
वीवो वाय73 2021 एडिशनचे रिजोल्यूशन 2400 × 1080 पिक्सल असेल. हा फोन 6.44 इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह लाँच केला जाईल. या फोनमध्ये अॅमोलेड पॅनल असल्यामुळे हा इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीसह येईल.
वीवोचा हा आगामी फोन अँड्रॉइड 11 ओएससह लाँच केला जाईल. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकचा हीलियो जी95 चिपसेट देण्यात येईल. हा फोन 8 जीबी रॅमला सपोर्ट करेल, त्याचबरोबर यात 3 जीबी अतिरिक्त रॅम देखील दिला जाईल. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये माली जी76 जीपीयू मिळू शकतो.
वीवो वाय73 (2021) ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लाँच होईल. रिपोर्टनुसार, फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर असेल. त्याचबरोबर 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर या फोनमध्ये मिळेल. तसेच, फोनच्या फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो. पावर बॅकअपसाठी Vivo Y73 (2021) मध्ये 4,000एमएएचची मोठी बॅटरी असेल जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल.