Vivo Y73 येईल 10 जूनला भारतात; कंपनीने सादर केला या लो बजेट फोनचा टीजर
By सिद्धेश जाधव | Published: June 7, 2021 06:57 PM2021-06-07T18:57:16+5:302021-06-07T18:57:52+5:30
Vivo Y73 Launch: अभिनेत्री सारा अली खान Vivo Y73 स्मार्टफोनची लाईव्ह अनबॉक्सिंग करेल.
Vivo इंडियाचे डायरेक्टर निपुण मार्या यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून सांगितले होते कि कंपनी भारतात आपली ‘वाय’ सीरीज वाढवणार आहे. कंपनी नवीन स्मार्टफोन Vivo Y73 घेऊन येत आहे. आज कंपनीने या फोनच्या लाँचची तारीख देखील सांगितली आहे. वीवोने अधिकृतपणे घोषणा केली आहे कि, वीवो वाय73 स्मार्टफोन येत्या 10 जूनला भारतात लाँच केला जाईल. विशेष म्हणजे, Vivo Y73साठी कंपनीने बॉलीवुड अभिनेत्री सारा अली खान सोबत भागीदारी केली आहे. (Vivo Y73 smartphone will Launch in India on 10 June with Sara Ali Khan)
वीवो वाय73 स्मार्टफोन येत्या 10 जूनला भारतात लाँच केला जाईल. हा फोन अभिनेत्री सारा अली खानद्वारे सादर केला जाईल. वीवो इंडियाने सांगितले आहे कि 10 जूनला सारा अली खान Vivo Y73 स्मार्टफोनची लाईव्ह अनबॉक्सिंग करेल आणि या अनबॉक्सिंग ईवेंटद्वारे, फोनची किंमत आणि विक्रीची तारीख सांगण्यात येईल. वीवोने Y-Series साठी साराला Chief Style Icon बनवले आहे.
Vivo Y73 (2021) चे स्पेसिफिकेशन
काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार, वीवो वाय73 2021 मध्ये 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.44 इंचाचा फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असेल. हा एक अॅमोलेड पॅनल असेल. वीवोचा हा आगामी स्मार्टफोन अँड्रॉइड 11 ओएसवर लाँच केला जाईल. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये मीडियाटेकचा हीलियो जी95 चिपसेट आणि माली जी76 जीपीयू देण्यात येईल. लीकनुसार, हा फोन 8 जीबी रॅम आणि 3 जीबी अॅडीशनल रॅम देखील दिला जाईल.
वीवो वाय73 (2021) ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लाँच होईल. रिपोर्टनुसार, फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सेन्सर दिला जाईल. या मुख्य सेन्सर सोबत 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि डेफ्थ मिळेल. फोनमधील फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सलचा असेल. पावर बॅकअपसाठी Vivo Y73 (2021) मध्ये 4,000एमएएचची बॅटरी असल्याचे समोर आले आहे, हि बॅटरी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल.