50MP च्या शानदार कॅमेऱ्यासह आला Vivo Y75 5G; दमदार प्रोसेसरसह 5000mAh ची बॅटरी
By सिद्धेश जाधव | Published: January 27, 2022 03:20 PM2022-01-27T15:20:18+5:302022-01-27T15:20:38+5:30
Vivo Y75 5G Phone: Vivo Y75 5G भारतात 8GB RAM, 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 18W फास्ट चार्जिंगसह बाजारात आला आहे.
Vivo Y75 5G Phone भारतात लाँच झाला आहे. हा कंपनीच्या वाय सीरिजमध्ये लाँच झालेला 5वा फोन आहे. कंपनीनं फक्त महिन्याभराच्या कालावधीत इतके मॉडेल देशात सादर केले आहेत. Vivo Y75 5G भारतात 8GB RAM, 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 18W फास्ट चार्जिंगसह बाजारात आला आहे. चला जाणून घेऊया या फोनची किंमत आणि स्पेक्स.
Vivo Y75 5G ची किंमत
Vivo Y75 5G स्मार्टफोनचा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला एकच व्हेरिएंट भारतात आला आहे. कंपनीनं या फोनची किंमत 21,990 रुपये ठेवली आहे. हा डिवाइस स्टारलाईट ब्लॅक आणि ग्लोयिंग गॅलेक्सी कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा फोन 27 जानेवारीपासून विवोच्या अधिकृत वेबसाईट, आणि रिटेल स्टोर्सवरून विकत घेता येईल.
Vivo Y75 5G चे स्पेसिफिकेशन
Vivo Y75 5G मध्ये 6.58 इंचाचा फुल एचडी+ इन-सेल डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनला मीडियाटेकच्या डायमेन्सिटी 700 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. सोबत 8 जीबी रॅम आणि 128 जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळते. कंपनीनं 4 जीबी एक्सटेंडेड रॅमचं फीचर देखील दिलं आहे, त्यामुळे एकूण रॅम 12 जीबीवर जातो. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएस 12 वर चालतो.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. साईड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि बेसिक कनेक्टिव्हिटी फिचर देखील मिळतात. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.
हे देखील वाचा:
- iPhone 13 वर मिळतोय जबरा डिस्काउंट; लेटेस्ट Apple प्रोडक्ट्सवर ऑफर्सचा पाऊस
- Lokmat Tech Tips: अनेक वर्ष वापरून देखील नव्या सारखा राहील तुमचा स्मार्टफोन; फक्त या 5 गोष्टींची काळजी घ्या