12GB RAM आणि 50MP कॅमेऱ्यासह आला Vivo Y76 5G Phone; एकदा पहाच फीचर्स
By सिद्धेश जाधव | Published: November 23, 2021 03:45 PM2021-11-23T15:45:08+5:302021-11-23T17:41:16+5:30
Vivo Y76 5G Phone Launch: Vivo Y76 5G Phone मलेशियात 50MP Camera, 8GB RAM आणि 44W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे.
Vivo ने आपल्या ‘वाय’ सीरीजमध्ये स्मार्टफोन सादर करण्याचा सपाट सुरूच ठेवला आहे. कंपनीने गेल्या काही दिवसांमध्ये अनेक फोन वेगवेगळ्या देशांमध्ये सादर केले आहेत. यात आता नवीन मोबाईल फोन Vivo Y76 5G ची भर पडली आहे. विवो वाय76 सध्या मलेशियात लाँच झाला आहे, जो आगामी काही दिवसांमध्ये जागतिक बाजारात उपलब्ध होईल.
Vivo Y76 चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y76 अँड्रॉइड 11 वर आधारित फनटचओएस 12 वर चालतो. फोनमध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक डिमेन्सिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 4 जीबी व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो. फोनमध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.
या विवो फोनमध्ये 6.58 इंचाच फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी विवो वाय76 च्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी विवो वाय76 मध्ये 4,100एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.
Vivo Y76 ची किंमत
Vivo Y76 चा एकमेव व्हेरिएंट 1,299 MYR मध्ये सादर करण्यात आला आहे, ही किंमत 22,900 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा फोन भारतात कधी येईल याची माहिती मात्र अजून मिळालेली नाही.