Vivo Y81 स्मार्टफोन झाला स्वस्त, जाणून घ्या आता नवीन किंमत!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 04:02 PM2018-09-21T16:02:29+5:302018-09-21T16:04:02+5:30
चीनची मोबाईल कंपनी व्हिवोने गेल्या महिन्यात आपला मिड-रेंज स्मार्टफोन Vivo Y81 लॉन्च केला होता. आता कंपनीने या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे.
नवी दिल्ली : चीनची मोबाईल कंपनी व्हिवोने गेल्या महिन्यात आपला मिड-रेंज स्मार्टफोन Vivo Y81 लॉन्च केला होता. आता कंपनीने या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. मुंबईचे रिटेलर महेश टेलिकॉमने माहिती दिली की, या स्मार्टफोनची किंमत १, ००९ रुपयांनी कमी केली आहे. लॉन्चिंगवेळी Vivo Y81 या फोनची किंमत १२, ९९९ रुपये ठेवण्यात आली होती. आता हा स्मार्टफोन ११, ९९० रुपयांना विकला जाणार आहे.
Vivo Y81 चे स्पेसिफिकेशन्स
या स्मार्टफोनमध्ये ६.२२ इंचाची एचडी + (720x1520 पिक्सल) आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन देण्यात आलाय. Vivo Y81 मध्ये २.० गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर मीडियाटेक एमची ६७६२ प्रोसेसर, ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आलं आहे. स्टोरेड मेमरी कार्डच्या माध्यमातून २५६ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकतं.
फोटोग्राफीसाठी Vivo Y81 मध्ये १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा सेंसर आहे. याचं अपर्चर एफ/२.२ आणि एलइडी फ्लॅशसोबत आहे. कॅमेरामध्ये एचडीआर, प्रो मोड, पोर्टेट, बोकेह मोड, एआय फेस ब्यूटी, स्लो मोशन, टाइम प्लॅप्स, पॅनोरमा, डॉक मोड, पीडीएएफ, फिल्टर्स, पाम कॅप्चर, व्हॉईस कंट्रोल आणि लाईव्ह फोटोसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. समोरच्या बाजूने ५ मेगापिक्सल सेल्फी सेंसर आणि फ्रन्ट स्क्रीन फ्लॅश आहे. फ्रन्ट कॅमेराही एचडीआर, फेस ब्यूटी, ग्रुप सेल्फी, फिल्टर, पाम कॅप्चरसारख्या फीचर्सना सपोर्ट करतो.