व्होडाफोन आयडियाचा दमदार 'फॅमिली प्लॅन'! एकाच बिलात दोघांचा होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 07:47 PM2023-07-26T19:47:53+5:302023-07-26T19:48:28+5:30

दोघांना मिळणार वेगवेगळ्या सुविधा, जाणून घ्या प्लॅनबद्दल सविस्तर...

Vodafone Idea 601 postpaid family plan check details it provides two users in single bill | व्होडाफोन आयडियाचा दमदार 'फॅमिली प्लॅन'! एकाच बिलात दोघांचा होणार फायदा

व्होडाफोन आयडियाचा दमदार 'फॅमिली प्लॅन'! एकाच बिलात दोघांचा होणार फायदा

googlenewsNext

Vi 601 Postpaid Family Plan: मोबाईल सेवा कंपनी वोडाफोन आयडिया अनेक पोस्टपेड प्लॅन आणत आहे. वोडाफोन आणि आयडिया यांचे मर्जर झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळे आकर्षक प्लॅन्स आणले. यात आता आणखी एका प्लॅनची भर पडली आहे. Vi ने 601 रुपयांचा अतिशय परवडणारा फॅमिली प्लॅन आहे. या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे ते दोन कनेक्शनसह येते. या प्लॅनमध्ये पहिल्या युजरला कोणते फायदे मिळतील आणि दुसऱ्या युजरला काय सुविधा मिळतील जाणून घेऊया-

Vodafone Idea चा Rs 601 प्लॅन

एक फर्स्ट हँड युजर नंबर आणि एक सेकंडरी कनेक्शन यासह असा या प्लॅनचा लाभ घेता येऊ शकतो. सर्वप्रथम, ज्याच्या नावाने प्लॅन असेल त्या नंबरच्या युजरला काय फायदे मिळतील, ते जाणून घेऊया. यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 3000 SMS आणि 70 GB डेटा उपलब्ध आहे. यामध्ये, Binge All Night ची सुविधा आहे. तसेच, FUP व्यतिरिक्त, अमर्यादित डेटाचा लाभ दररोज रात्री 12 AM ते सकाळी 6 AM दरम्यान मिळेल. यामध्ये 200GB डेटा रोलओव्हरची सुविधाही दिली जाणार आहे.

Vi Movies आणि TV व्यतिरिक्त, Vi अॅपमध्ये हंगामा म्युझिक, Vi गेम्स, Amazon Prime 6 महिन्यांसाठी, Disney+ Hotstar Mobile 1 वर्षांसाठी, SonyLIV Mobile 12 महिन्यांसाठी आणि SunNXT Premium 1 वर्षासाठी मिळणार आहे.

सेकंडरी युजर नंबरसाठी काय सुविधा?

सेकंडरी कनेक्शन युजरला अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, दरमहा 3000 SMS आणि 40 GB डेटासह शेअरिंगसाठी 10 GB डेटा दिला जाईल. या प्लॅनमध्ये 200GB डेटा रोलओव्हर सुविधाही देण्यात आली आहे. याशिवाय, Vi ने रु. 1001 आणि रु. 1151 फॅमिली पोस्टपेड प्लॅनही आणले आहेत. या योजना अनुक्रमे 4 आणि 5 मोबाईल कनेक्शनसह येतात. यासाठी तुम्ही Vi Store वर जाऊ शकता किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

Web Title: Vodafone Idea 601 postpaid family plan check details it provides two users in single bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.