Vodafone Idea ची जोरदार मुसंडी, जिओला दिला ग्राहकसंख्येत धोबीपछाड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 10:29 AM2019-09-19T10:29:09+5:302019-09-19T10:29:39+5:30
व्होडाफोन आयडियाने पुन्हा एकदा सर्वाधिक अॅक्टिव्ह सबस्क्रायबर्स जोडले आहेत.
नवी दिल्ली : तीन वर्षांपूर्वी जिओनेव्होडाफोन, एअरटेलसारख्या जुन्या कंपन्यांना सळो कू पळो करून सोडले होते. जिओचा 4जी स्पीड आणि स्वस्तातील डेटा, कॉलिंग पॅकमुळे अन्य कंपन्यांची भंबेरी उडाली होती. यामुळे या कंपन्या इतकीवर्षे ग्राहकांना लुटत असल्याचे पुढे आले होते. मात्र, व्होडाफोननेआयडियाला विकत घेतल्याने जिओचा नंबर घसरला आहे.
व्होडाफोन आयडियाने पुन्हा एकदा सर्वाधिक अॅक्टिव्ह सबस्क्रायबर्स जोडले आहेत. ट्रायच्या अहवालानुसार व्होडाफोन आयडियाने जुलै-ऑगस्टमध्ये जिओपेक्षा जास्त ग्राहक जोडले आहेत. 31 जुलै 2019 पर्यंत Vodafone Idea चे 38 कोटी अॅक्टिव्ह ग्राहक बनले आहेत. तर जिओचे 33.4 कोटी युजर्स आहेत. भारती एअरटेलकडे 32.9 कोटी युजर्स आहेत.
ट्रायच्या ताज्या अहवालानुसार देशात वायरलेस ग्राहकांची संख्या 1168.3 दशलक्ष म्हणजेच 117 कोटी आहे. जुलैच्या शेवटापर्यंत रिलायन्स जिओ आणि बीएसएनएलने नवे ग्राहक जोडले होते. जीओने 8.5 दशलक्ष नवीन ग्राहक जोडले. तर बीएसएनएलने 2 लाख नवीन ग्राहक जोडले होते. Vodafone Idea ने गेल्या वर्षीच्या जुलैपासून आता पर्यंत सर्वाधिक ग्राहक गमावले होते. गेल्या तीन वर्षांपासून एअरटेल, व्होडाफोनला हा धक्का सहन करावा लागत होता.