वोडाफोन-आयडियाचे दोन नवीन स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर; जाणून घ्या फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 06:58 PM2021-07-02T18:58:15+5:302021-07-02T18:58:44+5:30
Vodafone Idea Prepaid plans: वोडाफोन-आयडिया (Vi) ने आपल्या प्रीपेड युजर्ससाठी दोन नवीन प्लॅन सादर केले आहेत. या प्लॅन्सची किंमत 99 रुपये आणि 109 रुपये आहे.
वोडाफोन-आयडिया (Vi) ने आपल्या प्रीपेड युजर्ससाठी दोन नवीन प्लॅन सादर केले आहेत. या प्लॅन्सची किंमत 99 रुपये आणि 109 रुपये आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये मिळणारे फायदे सारखेच आहेत फक्त किंमत आणि वैधता वेगळी आहे. चला जाणून घेऊया वोडाफोन आयडियाच्या या दोन्ही प्लॅनबाबत सविस्तर.
Vi चा 99 रुपयांचा प्लॅन
Vi च्या 99 रुपयांचा प्रीपेड प्लॅनमध्ये 18 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग देण्यात येत आहे. कंपनीने या प्लॅनमध्ये 1GB डेटा दिला आहे. यात फ्री एसएमएसचा फायदा मिळत नाही.
Vi चा 109 रुपयांचा प्लॅन
109 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणारे फायदे हे 99 रुपयांच्या प्लॅन सारखे आहेत. फक्त या प्लॅनमध्ये जास्त वैधता देण्यात आली आहे. Vi च्या 109 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 20 दिवसांची वैधता मिळते. इतर फायदे पाहता अनलिमिटेड कॉलिंग आणि 1GB डेटा हे फायदे 99 रुपयांच्या प्लॅन प्रमाणेच आहेत. या प्लॅनमध्ये देखील फ्री एसएमएस मिळत नाहीत.
Vi चा 128 रुपयांचा प्लॅन
काही दिवसांपूर्वी वोडाफोन आयडियाने 128 रूपयांचा एक प्लॅन लाँच केला होता. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 10 लोकल नाईट मिनिट्स देण्यात येत आहेत. तसेच ग्राहकांना लोकल आणि नॅशनल कॉल्ससाठी 2.5 पैसे प्रति सेकंदाचा चार्ज द्यावा लागेल. वोडाफोन आयडियाच्या 128 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना लोकल एसएमएससाठी 1 रूपया, एसटीडीसाठी 1.5 रुपये आणि आयएसडी एसएमएससाठी 5 रुपये द्यावे लागतील. या प्लॅनसोबत मिळणारे नाईट मिनिट्स हे रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत वापरता येतील. सध्या प्लॅन काही निवडक सर्कल्समध्येच उपलब्ध आहे. तसंच या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे.सध्या या प्लॅनचा फायदा मुंबई, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश (पूर्व), उत्तर प्रदेश (पश्चिम) या ठिकाणी उपलब्ध आहे. लवकरच हा प्लॅन अन्य सर्कल्समध्येही लाँच केला जाऊ शकतो. वोडाफोन आयडियाच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना मोफत कॉलिंग आणि डेटासारख्या सुविधा देण्यात येत नाही. परंतु ज्या लोकांना आपला नंबर सुरू ठेवायचा आहे आणि केवळ इनकमिंक कॉल्स अपेक्षित आहे अशा लोकांसाठी हा प्लॅन आणण्यात आला आहे.