5G ट्रायलमध्ये Vodafone-idea नंबर वन; तिप्पट इंटरनेट स्पीडने दिली Jio-Airtel ला मात 

By सिद्धेश जाधव | Published: September 20, 2021 12:17 PM2021-09-20T12:17:05+5:302021-09-20T12:18:03+5:30

Vodafone idea 5G trial: वोडाफोन आयडियाने आपल्या 5G ट्रायल दरम्यान 3.7 Gbps चा पीक स्पीड नोंदवल्याचा दावा केला आहे. हा स्पीड इतर कंपन्यांच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे.  

Vodafone idea new mmwave 5g trial record speed 3 7gbps  | 5G ट्रायलमध्ये Vodafone-idea नंबर वन; तिप्पट इंटरनेट स्पीडने दिली Jio-Airtel ला मात 

5G ट्रायलमध्ये Vodafone-idea नंबर वन; तिप्पट इंटरनेट स्पीडने दिली Jio-Airtel ला मात 

Next

Vodafone-idea ने रविवारी पुण्यात केलेल्या 5G ट्रायलमध्ये 3.7 Gbps चा स्पीड नोंदवला आहे. हा स्पीड प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या ट्रायलच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. या टेस्टसाठी कंपनीने mmwave स्पेक्ट्रमचा वापर केला होता. तर 3.5Ghz बँडचा वापर करून गांधीनगर आणि पुण्यात केलेल्या चाचणीत कंपनीने 1.5Gbps चा स्पीड मिळवला आहे.  

सध्या भारतात फास्ट इंटरनेट मिळण्याचे स्वप्न लवकरच सत्यात येणार असल्याचे दिसत आहे. देशात 5G इंटरनेट टेक्नॉलॉजीच्या चाचणीला सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर Airtel आणि Jio ने आपल्या चाचण्या सुरु केल्या आहेत. आता वोडाफोन आयडियाने आपल्या 5G ट्रायल दरम्यान 3.7 Gbps चा पीक स्पीड नोंदवल्याचा दावा केला आहे. हा स्पीड इतर कंपन्यांच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे.  

वोडाफोन आयडियाने गांधीनगर आणि पुण्यात मिड-बँड स्पेक्ट्रमचा वापर करून 1.5 Gbps डाउनलोड स्पीड मिळवला आहे. तर mmwave चा वापर करून इतर कंपन्यांच्या तुलनेत तिप्पट स्पीडची नोंद केली आहे. यावर्षी Jio ने जूनमध्ये 1 Gbps चा पीक स्पीड नोंदवल्याचे सांगितले होते. Airtel ने देखील जुलैमध्ये या स्पीडसह चाचणी केली होती. त्यामुळे 5G इंटरनेट स्पीडच्या बाबतीत Vi या कंपन्यांना मात देत असल्याचे दिसत आहे. कंपनीला 5G नेटवर्क ट्रायल्ससाठी 3.5 गीगाहर्ट्ज स्पेक्ट्रम बँडसह टेलिकॉम डिपार्टमेंटकडून 26 गीगाहर्ट्ज सारखा हाय फ्रिक्वेंसी बँड देण्यात आला आहे.  

 

Web Title: Vodafone idea new mmwave 5g trial record speed 3 7gbps 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.