Vodafone च्या 4G ग्राहकांना तब्बल २,४०० रुपयांच्या कॅशबॅकची संधी, त्वरा करा ऑफर ३० जूनपर्यंत!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 08:27 AM2022-06-17T08:27:54+5:302022-06-17T08:28:56+5:30
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत आता बहुतांश स्मार्टफोन 5G नेटवर्कला सपोर्ट करणारे येऊ लागले आहेत. पण भारतात अजूनही 2G नेटवर्क देखील सुरू आहे.
नवी दिल्ली-
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत आता बहुतांश स्मार्टफोन 5G नेटवर्कला सपोर्ट करणारे येऊ लागले आहेत. पण भारतात अजूनही 2G नेटवर्क देखील सुरू आहे. कारण देशात कोट्यवधी यूझर्स आजही 2G नेटवर्क वापरणारे आहेत. यामागचं कारण म्हणजे 4G नेटवर्कची सुविधा असलेल्या स्मार्टफोनची किंमत असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळेच अनेक यूजर्स अजूनही 2G हून 4G नेटवर्कवर आलेले नाहीत. अशातच 4G नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांसाठी वोडाफोन आयडियानं एक खास ऑफर आणली आहे. कंपनी आपल्या 4G यूझर्सना दरमहा १०० रुपये कॅशबॅक ऑफर करत आहे. म्हणजेच वर्षभरात तुम्हाला २४०० रुपयांची कमाई कॅशबॅकच्या माध्यमातून करता येऊ शकणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार वोडाफोन यूझर्ससाठीही ही ऑफर ३० जून २०२२ पर्यंत घेता येणार आहे.
2G वरुन 4G डिवाइसमध्ये शिफ्ट करणाऱ्या Vi च्या ग्राहकांनाच या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. यासोबतच ग्राहकांना Vi च्या अॅपमध्येच दरमहा १०० रुपये कॅशबॅक दिलं जाईल याची वॅलेडिटी देखील ३० दिवसांची असणार आहे. त्यामुळे तुम्हाला दर महिन्याला कोणत्याही परिस्थितीत या कॅशबॅक व्हाऊचरचा वापर करावा लागेल. तुम्ही जर 2G चे ग्राहक असाल आणि 4G नेटवर्कवर स्विच करणार असाल तर पुढील स्टेप्स फॉलो करुन तुम्ही ऑफरचा लाभ घेऊ शकता...
स्टेप- १: तुम्ही जर 2G सेवा देणारा स्मार्टफोन वापरत असाल तर सर्वात आधी तुम्हाला 4G सेवा देणारा स्मार्टफोन खरेदी करावा लागेल.
स्टेप- २: तुम्ही जर ऑफर अंतर्गत पात्र ठरत असाल तर तुम्हाला Vi कडून एक मेसेज जारी केला जाईल.
स्टेप- ३: २९९ रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांच्या अनलिमिटेड पॅक तुम्ही घेतला तर तुम्हाला दरमहा पुढील २४ महिन्यांसाठी १०० रुपये कॅशबॅक दिला जाईल.
स्टेप- ४: तुम्हाला VI अॅप डाऊनलोड करावा लागेल जिथं My Coupons सेक्शनमध्ये Rs 100x24 मासिक कूपन दिसतील.
स्टेप- ५: २९९ रुपये आणि त्यापेक्षा अधिक अनलिमिटेड प्लानसाठी पुढील २४ रिचार्जमध्ये तुम्हाला १०० रुपये दरमहा कॅशबॅक कूपन उपलब्ध करुन दिले जातील.
महत्वाची बाब म्हणजे ही ऑफर केवळ VI कंपनीच्या प्रीपेड यूझर्ससाठीच आहे. त्यामुळे तुम्हाला जर या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर प्रीपेड प्लानवरुन पोस्ट पेड प्लानमध्ये शिफ्ट होऊ नका.