Vodafone Idea चा शानदार Plan! कमी किमतीत मिळतोय 90GB डेटा आणि बरेच काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 11:18 AM2022-06-22T11:18:07+5:302022-06-22T11:28:13+5:30
vodafone idea : आज आम्ही तुम्हाला Vi च्या अशाच एका प्लॅनबद्दल सांगत आहोत, जो युजर्स डिव्हाइससह ऑफर करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : Vodafone Idea (Vi) आपल्या युजर्सना 499 रुपयांच्या प्लॅनसह 90GB एक-वेळ मासिक डेटा देत आहे. मात्र, हा प्रीपेड किंवा पोस्टपेड प्लॅन नाही. हा एक असा प्लॅन आहे, जो MiFi डिव्हाइससह युजर्सना ऑफर केला जात आहे. MiFi डिव्हाइस म्हणजे काय आहे, याचा विचार करत असाल, तर ते एक पोर्टेबल वाय-फाय हॉटस्पॉट डिव्हाइस आहे, जे युजर्सला चालता-फिरता इंटरनेटशी कनेक्ट राहण्याची परवानगी देते. आज आम्ही तुम्हाला Vi च्या अशाच एका प्लॅनबद्दल सांगत आहोत, जो युजर्स डिव्हाइससह ऑफर करण्यात आला आहे.
Vodafone Idea 200GB डेटा रोलओव्हरसह 90GB मासिक डेटासह 499 रुपयांचा MiFi प्लॅन ऑफर करत आहे. अतिरिक्त डेटासाठी युजर्ससाठी प्रति जीबी डेटा 20 रुपये आकारले जातील. जर तुम्ही यापेक्षा कमी खर्चाचा प्लॅन शोधत असाल तर तो देखील उपलब्ध आहे. हा प्लॅन 399 रुपयांना येतो आणि 50GB डेटा दिला जातो. पुन्हा 200GB डेटा रोलओव्हर आणि प्रत्येक GB साठी अतिरिक्त 20 रुपयांत मिळतो.
डिव्हाइससाठी 2,000 रुपये देखील द्यावे लागतील
जर तुम्ही नवीन MiFi युजर्स असाल तर तुम्हाला डिव्हाइससाठी 2,000 रुपये देखील द्यावे लागतील. हे डिव्हाइस डिलिव्हरीच्या वेळी द्यावे लागेल. Vi चे म्हणणे आहे की, डोंगल 150 Mbps पर्यंतच्या डाउनलोड स्पीडला आणि 50 Mbps च्या अपलोड स्पीडला सपोर्ट करू शकते. अर्थात, वेग तुम्हाला कोणत्या प्रकारची नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळत आहे, यावर अवलंबून आहे. हे प्रोडक्ट एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर 5 ते 6 तासांपर्यंत चालू शकते. एकूण 10 वाय-फाय-सक्षम डिव्हाइस Vi MiFi शी कनेक्ट केले जाऊ शकतात.
हे निश्चितपणे एकप्रकारे कॅरिअर-लॉक केलेले डिव्हाइस असणार आहे, याचा अर्थ तुम्ही डिव्हाइसमध्ये Jio आणि Airtel सिम वापरू शकणार नाही. तुम्हाला Vi MiFi साठी खास क्युरेट केलेला Vi प्लॅन निवडावा लागेल. या प्रोडक्टचा सर्वात मोठा फायदा असा आहे की, तुम्ही तुमचा मोबाइल डेटा संपवण्याशिवाय अनेक डिव्हाइस जसे की, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि बरेच काही कनेक्ट करू शकता.