Jio आणि Airtel नंतर आता Vi चे प्लॅन महागले; जाणून घ्या नवीन किमती...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 18:18 IST2024-07-04T18:17:33+5:302024-07-04T18:18:35+5:30
नवीन दर आजपासून लागू झाले आहेत.

Jio आणि Airtel नंतर आता Vi चे प्लॅन महागले; जाणून घ्या नवीन किमती...
Vodafone Idea (Vi) Price Hike : Jio आणि Airtel नंतर आता Vodafone Idea(vi) ने देखील आपल्या विविध प्लॅन्सच्या किमती वाढवल्या आहेत. नवीन प्लॅनची किंमत आज, म्हणजेच 4 जुलैपासून वाढवण्यात आली आहे. 2021 नंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्लॅनच्या किमतीत एवढा मोठा बदल केला आहे. vi ने सांगितले की, ते 5G सेवा लॉन्च करण्यासाठी गुंतवणूक करत आहे. येत्या काही दिवसांत 4G ची सर्व्हिस सुधारेल आणि 5G सेवा देखील सुरू होईल..
मिळालेल्या माहितीनुसार, Vi ने किंमती वाढवल्यानंतर आता 28 दिवसांचा प्लॅन 199 रुपये झाला आहे, तर जुनी किंमत 179 रुपये होती. नवीन दरात सुमारे 20 रुपयांनी वाढ झाली आहे. 84 दिवसांसाठी सर्वात स्वस्त प्लॅन पूर्वी 459 रुपयांचा होता, जो आता 509 रुपयांचा झाला आहे. यामध्ये यूजर्सना 6GB इंटरनेट डेटा मिळणार आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत तुम्हाला एसएमएसची सुविधा मिळेल.
तर, Vi च्या वार्षिक योजनेची किंमत 1,999 रुपये झाली आहे, जी पूर्वी 1799 रुपये होती. या प्लॅनमध्ये यूजर्सना 24GB इंटरनेट डेटा मिळेल. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगही मिळणार आहे. यामध्ये स्थानिक आणि एसटीडी कॉलचा समावेश आहे.