पीक जास्त आणि खर्च कमी करण्यासाठी वोडाफोन आयडियाची शेतकऱ्यांना ‘स्मार्ट’ मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 05:26 PM2022-06-10T17:26:46+5:302022-06-10T17:26:55+5:30
इंटरनेट ऑफ थिंग्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचा वापर करून स्मार्टअॅग्री प्रकल्प अचूक आणि व्यावहारिक माहिती पुरवतो ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक चांगले पीक व उत्पन्न मिळवण्यात मदत होते.
‘वी’ची कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) संस्था वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आपला परिवर्तनात्मक 'स्मार्टअॅग्री' प्रकल्प उत्तर प्रदेश, राजस्थान, आसाम आणि तेलंगणामधील कृषीबहुल भागांमध्ये विस्तारत आहे. ‘वी’च्या सीएसआर स्मार्टअॅग्री प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या रोजगारात सुधारणा घडवून आणता यावी आणि शेतीच्या पर्यावरणानुकूल पद्धतींचा वापर करता यावा यासाठी मदत करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
इंटरनेट ऑफ थिंग्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रिअल-टाइम टेक्नॉलॉजी उपायांचा वापर करून स्मार्टअॅग्री प्रकल्प शेतकऱ्यांना शेतीमधील महत्त्वाच्या घटकांबद्दल माहिती पुरवतो. यामध्ये माती व हवेची गुणवत्ता, कीटक आणि पिकांची वाढ यांचा समावेश असतो.
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसंदर्भात प्रत्यक्षात उपयोगात आणता येईल अशी आणि स्थानिक पातळीवर उपयुक्त ठरेल अशी महत्त्वाची माहिती, त्याबरोबरीनेच बाजारपेठा, सरकारी धोरणे आणि योजना इत्यादींचा समावेश असलेल्या कृषी बातम्या पुरवल्या जातात. शेतकऱ्यांना ही सर्व माहिती त्यांच्या मोबाईल फोनवर त्यांच्या क्षेत्रीय भाषेमध्ये पुरवली जाते, एखाद्या शेतकऱ्याला माहिती वाचण्यात अडचण येत असल्यास ऑडिओ पर्याय देखील उपलब्ध आहे.
स्मार्टअॅग्रीची सुरुवात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील कृषीबहुल भागांमध्ये करण्यात आली, आता हा प्रकल्प अजून चार राज्यांमध्ये विस्तारला जात आहे, यामुळे २.८ लाखांहून जास्त शेतकऱ्यांना ८ ते १२% जास्त पिके पिकवण्यासाठी आणि शेतीसाठी येणाऱ्या खर्चात १५ ते २० टक्क्यांची घट करण्यासाठी सक्षम केले आहे.
आता वोडाफोन आयडिया फाऊंडेशन उत्तर प्रदेशात हरदोई, लक्ष्मीमपूर, राजस्थानात बुंदी, कोटा, टोंक, बारन, आसाममध्ये दिब्रुगढ, जोरहाट, तिनसुकिया, उडाल्गुरी आणि तेलंगणामध्ये आदिलाबाद मधील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानामार्फत मदत पुरवेल.
स्मार्टअॅग्री प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतीच्या पर्यावरणानुकूल पद्धतींचा समावेश करण्यासाठी भौतिक मदत देखील पुरवली जाते. स्मार्टअॅग्रीने शेतकऱ्यांना साहाय्य पुरवण्यासाठी आणि त्यांच्या पिकांविषयी महत्त्वाची माहिती सहजपणे मिळवता यावी यासाठी १२५ टेक-सॅव्ही युवा कृषी उद्योजकांना आणि १५ शेतकरी उत्पादक संघटनांना एम्पॅनेल केले आहे.