348 रूपयात अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग, व्होडाफोनची धमाका ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 05:55 PM2017-08-18T17:55:10+5:302017-08-18T18:03:34+5:30
भारतीय टेलिकॉम क्षेत्रात धमाका करणा-या रिलायन्स जिओला टक्कर देण्याचा सर्वच प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून प्रयत्न सुरू आहे. व्होडाफोनने ग्राहकांना आकर्षित कऱण्यासाठी एक खास ऑफर आणली आहे.
मुंबई, दि. 18 - भारतीय टेलिकॉम क्षेत्रात धमाका करणा-या रिलायन्स जिओला टक्कर देण्याचा सर्वच प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून प्रयत्न सुरू आहे. व्होडाफोनने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक खास ऑफर आणली आहे. 348 रुपयांमध्ये 28 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग अशी ही ऑफर आहे. प्रीपेड ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येईल. मात्र, ही ऑफर सध्या केवळ राजस्थानसाठी आहे पण लवकरच देशभरात ऑफर लागू होण्याची शक्यता आहे.
या ऑफरनुसार प्रिपेट ग्राहकांनी 348 रूपयांचं रिचार्ज केल्यास त्यांना 28 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सेवा वापरता येणार आहे. या ऑफरचा 3जी आणि 4जी दोन्ही हॅन्डसेट युझर्सना फायदा घेता येईल. राजस्थानच्या सर्व व्होडाफोन स्टोअर, मिनी स्टोअर आणि मल्टी ब्रॅंड रिटेल स्टोअरमधून या ऑफरसाठी रिचार्ज करता येईल. याशिवाय व्होडाफोनच्या अॅपद्वारेही रिचार्ज करता येणार आहे.
व्होडाफोनचा स्टुडेंट सर्व्हाईव्हल किट प्लॅन-
व्होडाफोननने विद्यार्थ्यांसाठी स्टुडेंट सर्व्हाईव्हल किट हा प्लॅनदेखील आणला आहे. 352 रुपयांचा हा प्लॅन आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना 84 दिवसांसाठी दररोज अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 1GB डेटा आणि इतर सुविधा मिळेल. यासाठी सर्वप्रथम 445 रूपयांचं पहिलं रिचार्ज करावं लागेल. त्यानंतर 352 रूपयांमध्ये हा प्लॅन घेता येईल. त्यानंतर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 1GB डेटा आणि इतर सुविधा मिळतील.
व्होडाफोन Super Hour : अनलिमिडेट कॉल आणि डाटा फक्त सात रुपयात !
सध्या टेलिकॉम इंडस्ट्रीत रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोन, एअरटेल आणि आयडियानेही नवे डेटा प्लॅन सुरु केले आहेत. व्होडाफोनने आपल्या ग्राहकांसाठी अगदी स्वस्तात असा व्होडाफोन Super Hour प्लॅन आणला आहे. व्होडाफोन Super Hour प्लॅन पोस्टपेड आणि प्रीपेड अशा दोन्ही ग्राहकांसाठी हा प्लॅन आहे. हा प्लॅन फक्त सात रुपयांमध्ये असून यामध्ये अनलिमिटेड 4G/3G डाटा मिळणार आहे. तसेच, व्होडाफोन ते व्होडाफोन फ्री कॉल करता येणार आहे. याचबरोबर पोस्टपेड ग्राहक USSD कोडचा वापर करून व्होडाफोन Super Hour प्लॅनचा लाभ घेऊ शकतात.
व्होडाफोन Super Hour प्लॅन ग्राहक कधीही वापरु शकतात. यासोबतच बाकीचे रिचार्ज प्लॅन सुद्धा ग्राहक घेऊ शकतात. मात्र, ग्राहक अनलिमिटेड डाटा प्लॅनचा वापर करत असतील, तर त्यांना व्होडाफोन Super Hour प्लॅनचा लाभ घेता येणार नाही.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी व्होडाफोनने स्टुडंट सर्वाइवल किट प्लॅन लॉन्च केला आहे. हा प्लॅन 352 रुपयांचा आहे. यामध्ये 84 जीबी डाटा आणि फ्री कॉलची सुविधा देण्यात येत आली आहे. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. तसेच, प्रत्येक दिवशी मिळणा-या डाटाला एक जीबी FUP लिमिट देण्यात आली आहे. याचबरोबर फ्री कॉलिंगसाठी सुद्धा लिमिट ठेवण्यात आली आहे. याचबरोबर 300 मिनिट प्रत्येक दिवशी कॉलिंगसाठी फ्री मिळणार आहे, तर एका आठवड्यासाठी 1200 मिनिटपर्यंतची लिमिट देण्यात आली आहे.
गेल्या रक्षाबंधन सणानिमित्त सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) सुद्धा आपल्या ग्राहकांचासाठी खास ऑफर आणली आहे. बीएसएनएलले एक नवीन प्लॅन आणला असून 'राखी पे सौगात' असे नाव आहे. हा प्लॅन 74 रुपयांचा आहे. यामध्ये अनलिमिडेट कॉलिंग आणि 1 जीबी डाटा मिळणार आहे. 'राखी पे सौगात' हा प्लॅन 3 ऑगस्टला लॉन्च करण्यात आला. बीएसएनएलचा हा प्लॅन फक्त 12 दिवसांसाठी असणार आहे.