Apple कंपनीत नोकरी हवीये? '3C आणि 1E' लागेल; म्हणजे काय? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 09:05 PM2022-10-03T21:05:11+5:302022-10-03T21:05:28+5:30
तुमच्याकडे 3C आणि एक E क्वालिटी आहे, तर तुम्हाला Apple कंपनीत नोकरी मिळू शकते. जाणून घ्या याचा अर्थ...
Apple Job:तुम्हाला Apple कंपनीत नोकरी हवी आहे का? होय, तर तुम्ही ही बातमी जरूर वाचा. कंपनीचे CEO टीम कुक यांनी एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींमुळे तुम्हाला अॅपलमध्येनोकरी मिळणे सोपे होईल. टिम कुक यांनी एका विद्यापीठाच्या कार्यक्रमात सांगितले की, अॅपलमध्ये नोकरी करण्यासाठी उमेदवारामध्ये 4 गुण असणे महत्वाचे आहे. ते चार गुण म्हणजे, 3C आणि एक E.
3C, 1E आवश्यक
अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी इटलीतील एका विद्यापीठात हजेरी लावली. तिथे त्यांनी अॅपल कंपनीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी हव्या असणाऱ्या क्वालिटी सांगितल्या. कूक यांनी सांगितले की, कंपनीचे यश दोन गोष्टींवर अवलंबून आहे. पहिली गोष्ट- त्या कंपनीची संस्कृती आणि दुसरी गोष्ट- कंपनी कोणाला काम देते. अॅपल आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये 3C आणि एक E, हे गुण शोधते.
3C, 1E चा अर्थ काय?
3Cचा अर्थ- Collaborate, Creativity आणि Curiosity. तर, E चा अर्थ- Expertise. अॅपल सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने आपली उत्पादने तयार करते. यासाठी सहकार्य आणि एकत्र काम करण्याची क्षमता खूप महत्त्वाची आहे. अॅपल अशा लोकांचा शोध घेते, जे वेगळा विचार करतात. एखादे काम करण्यासाठी नेहमी वेगळा दृष्टिकोन ठेवा, असेही टीम कुक म्हणाले.