मोबाईलवरील खासगी अॅप गायब करायचेय...असे करा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 02:47 PM2018-09-19T14:47:52+5:302018-09-19T14:48:34+5:30

आपल्या मोबाईलमध्ये अशा काही गोपनीय फोटो, फाईल्स असतात ज्या दुसऱ्यांना दिसल्यास गजहब उडू शकतो. त्या लपवण्यासाठी जशी अॅप असतात तशीच गोपनीय अॅपही लपविण्यासाठी आहेत.

Want to hide app on mobile... do this | मोबाईलवरील खासगी अॅप गायब करायचेय...असे करा

मोबाईलवरील खासगी अॅप गायब करायचेय...असे करा

googlenewsNext

आपल्या मोबाईलमध्ये अशा काही गोपनीय फोटो, फाईल्स असतात ज्या दुसऱ्यांना दिसल्यास गजहब उडू शकतो. त्या लपवण्यासाठी जशी अॅप असतात तशीच गोपनीय अॅपही लपविण्यासाठी आहेत. अॅपचा अॅक्सेस एखाद्याला मिळाल्यास त्यामुळे तुमची गोपनीय माहिती उघड होऊ शकते. यामुळे अशी अॅप लपवूही शकणार आहात. 


यासाठी प्लेस्टोअरवरून अॅपेक्स लाँचर फोनमध्ये डाऊनलोड करावा लागणार आहे. या अॅपची साईज 10 एमबीपेक्षा कमी असेल. आपल्या फोनवर आधीच मोबाईल कंपनीचा लाँचर असतो. अॅपेक्स लाँचरवर क्लिक केल्यानंतर आधीचा लाँचर बदलेल. यानंतर अॅपेक्स सेटिंगमध्ये जाऊन सहाव्या नंबरवर हिडन अॅपचा पर्याय दिसेल. या वर क्लिक केल्यानंतर अॅड असा ऑप्शन येईल. त्यावर गेल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असलेल्या अॅपची यादी येईल. यानंतर तुम्हाला हवी असलेली अॅप निवडून ओके बटनवर क्लिक करावे. 


लपवलेली अॅप परत पहायची असतील तर पुन्हा अॅपेक्स सेटींगमध्ये जाऊन अनहाईड अॅप असा पर्याय क्लिक करावा व बाहेर पडावे.

Web Title: Want to hide app on mobile... do this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.