5G स्मार्टफोन खरेदी करायचाय? कोणता सर्वाधिक खपतोय? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 05:23 PM2023-01-19T17:23:29+5:302023-01-19T17:23:42+5:30

जर तुम्हाला ५जी स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला सर्वाधिक खपाचा स्मार्टफोन कोणता किंवा कोणती कंपनी हे माहिती आहे का?

Want to buy a 5G smartphone? Which one sales the most? Find out company and range | 5G स्मार्टफोन खरेदी करायचाय? कोणता सर्वाधिक खपतोय? जाणून घ्या...

5G स्मार्टफोन खरेदी करायचाय? कोणता सर्वाधिक खपतोय? जाणून घ्या...

Next

गेल्या दोन वर्षांपासूनच देशात फाईव्ह जी येणार असल्याचे वारे सुरु झाले होते. यामुळे कंपन्याही काहीच कल्पना नसताना फाईव्हजी फोन लाँच करत होत्या. आताच आलेल्या एका रिपोर्टनुसार शाओमीचे दोन फोन जिओचे फाईव्ह जी नेटवर्क वापरण्यास असमर्थ आहेत. आता देशात फाईव्ही जी लाँच झाले आहेत. यामुळे लोकांचा हे फोन घेण्याकडे सर्वाधिक कल आहे. १० हजारांपासून लाखभर रुपयांपर्यंत फोन उपलब्ध आहेत. 

जर तुम्हाला ५जी स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला सर्वाधिक खपाचा स्मार्टफोन कोणता किंवा कोणती कंपनी हे माहिती आहे का? Xiaomi आणि Realme चे 5G स्मार्टफोन भारतात सर्वाधिक पसंत केले जात आहेत. यामध्ये 10 हजार ते 20 हजार रुपयांच्या स्मार्टफोनचा समावेश आहे. देशात २० हजारांच्या आतील ५जी स्मार्टफोन सर्वाधिक विकले जात आहेत. 

या रेंजमधील एकूण स्मार्टफोनचा वाटा हा सध्या ८० टक्के आहे. Airtel आणि Jio द्वारे वापरकर्त्यांना 5G सेवा मोफत दिली जात आहे. ही सेवा सध्या विस्तारत आहे. लोकांना ५जीची रेंज असताना क़ॉलिंगवेळी समस्या येत आहे. अनेकदा फोन लागत नाहीय, लागलाच तर एका बाजुचाच आवाज ऐकायला येतोय अशा समस्या आहेत. या समस्या दूर करून एका वर्षात 5G नेटवर्क देशभरात आणले जाईल.

महागड्या 5G स्मार्टफोनमध्ये Samsung, Vivo आणि Oppo चा बोलबाला आहे. तर Apple प्रीमियम 5G स्मार्टफोन बाजारात यशस्वी आहे. सायबरमीडिया रिसर्चच्या अहवालानुसार २०२३ च्या अखेरीपर्यंत शिपमेंटमधील ५जी फोनची संख्या ७० टक्क्यांवर जाईल. २०२२ मध्ये हा वाटा ४५ टक्के असू शकतो. 2022 मध्येच 100 पेक्षा जास्त 5G स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत. 


 

Web Title: Want to buy a 5G smartphone? Which one sales the most? Find out company and range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :5G५जी