5G smartphone Guide: 5G येण्याआधी स्मार्टफोन घ्यायचाय? हे आहेत बेस्ट ऑप्शन, किंमतही १० हजारांपासून सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 01:01 PM2022-07-27T13:01:08+5:302022-07-27T13:01:33+5:30
5G smartphone Guide: सर्वात महत्वाचे म्हणजे फाईव्ह जी म्हटलेला प्रत्येक फोन हा फाईव्ह जीच्या सर्व बँडनी युक्त नसतो. ज्यामध्ये सर्व फाईव्ह जी बँड असतात ते काहीसे महागही असतात.
केंद्र सरकारने नुकताच 5G स्पेक्ट्रमचा लिलाव आयोजित केला होता. यामध्ये अदानींच्या नव्या कंपनीसह चार कंपन्यांनी सहभाग घेतला होता. आता कोणाला कोणता स्पेक्ट्रम आणि कितीला मिळाला हे अद्याप समजलेले नसले तरी येत्या तीन महिन्यांत देशातील १३ शहरांत फाईव्ह जी सेवा सुरु होणार आहे. एअरटेल, जिओने तर नेटवर्कही उभारण्यास सुरुवात केली आहे. असे असताना अनेकांचा फोन हरवतो, फुटतो किंवा खराब होतोय. यामुळे आता त्यांच्यासमोर कोणता फाईव्ह जी फोन घेऊ असा प्रश्न पडला आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे फाईव्ह जी म्हटलेला प्रत्येक फोन हा फाईव्ह जीच्या सर्व बँडनी युक्त नसतो. ज्यामध्ये सर्व फाईव्ह जी बँड असतात ते काहीसे महागही असतात. यामुळे परवडणाऱ्या किंमतीत काही फोन आहेत, जे तुम्हाला फाईव्ह जी स्मार्टफोन घेतल्याचा आनंद देऊ शकतात.
5 जी स्पेक्ट्रमच्या लिलावात पहिल्याच दिवशी 1.45 लाख कोटी रुपयांचे उत्पन्न सरकारला मिळाले आहे. हे फोरजी मध्ये मिळालेल्या 1.1 लाख कोटी रुपयांपेक्षा खुप जास्त आहेत. गेल्या वर्ष-दीड वर्षापासून सर्वच कंपन्यांनी फाईव्ह जी फोन भारतीय बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. परंतू ते जगभरात कॉमन वापरल्या जाणाऱ्या बँडचे होते. आता हळू हळू कंपन्यांनी अधिकाधिक बँडचे फोन बाजारात आणले आहेत. यामध्ये सर्वात कमी बँड म्हणजे दोन आणि सर्वाधिक बँडचे फोन म्हणजे १३ बँड असलेले स्मार्टफोन आहेत.
हे पहा २०००० रुपयांत असलेले काही स्मार्टफोन
Poco M4 5G: पोको कंपनीच्या या फाईव्ह जी स्मार्टफोनची किंमत सर्वात कमी म्हणजे 12,999 रुपये आहे. सध्या तो १०७४९ रुपयांपासून मिळत आहे. या फोनमध्ये 5जी चे सात बँड आहेत. यामध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज तसेच 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंट आहेत. यामध्ये अँड्रॉईड १२ असून 6.58 इंचाचा फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. पाठीमागील कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे. दुसरा दोन मेगापिक्सलचा आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. 5000 एमएएच बॅटरी आहे.
OnePlus Nord CE 2 Lite 5G मध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आलेले आहे. याची किंमत 19,999 रुपये आहे. 6.59 इंच फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ऑक्टा-कोर स्नैपड्रैगन 695 SoC वर हा फोन काम करतो. 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा सेन्सर देण्य़ात आला आहे. 33W SuperVOOC चार्जिंग सपोर्ट आहे.
यानंतर तुम्हाला व्हिवोचा टी१ हा फोनही जवळपास याच स्पेसिफिकेशनचा आहे. याची किंमत १६००० रुपयांपासून सुरु होते. Realme 9 5G SE देखील याच स्पेसिफिकेशनने येतो. Realme 9 Pro 5g हा फोन देखील १७९९९ रुपयांपासून सुरु होतो.
१० हजारापासून देखील ५जी फोन उपलब्ध आहेत. यामध्ये Redmi Note 10T 5G हा फोन देखील आहे. याची किंमत ११९०० रुपयांपासून सुरु होते.