जबरदस्त! iPhone सह Watch Series 10 देखील होणार लाँच; मोठा डिस्प्ले, अपग्रेड चिप मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 01:49 PM2024-09-07T13:49:59+5:302024-09-07T13:54:53+5:30

Apple ९ सप्टेंबर रोजी नवीन iPhone 16 सीरीजसह अनेक महत्त्वपूर्ण बदलांसह Apple Watch Series 10 लाँच करू शकते. यामध्ये मोठा डिस्प्ले आणि बॅटरीचा समावेश आहे.

Watch Series 10 to launch alongside iPhone Will get bigger display, upgrade chip | जबरदस्त! iPhone सह Watch Series 10 देखील होणार लाँच; मोठा डिस्प्ले, अपग्रेड चिप मिळणार

जबरदस्त! iPhone सह Watch Series 10 देखील होणार लाँच; मोठा डिस्प्ले, अपग्रेड चिप मिळणार

Apple आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवीन फिचर किंवा नवीन मोबाईल लाँच करत असते. आताही आयफोनने iPhone 16 आणला आहे. ९ सप्टेंबर रोजी iPhone 16 लाइनअप लाँच करणार आहे. यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या इट्स ग्लोटाइम इव्हेंटमध्ये Apple Watch Series 10 देखील लॉन्च होण्याची शक्यता आहे. 10 व्या वर्धापन दिनानिमित्त अनेक मोठे बदल करून स्मार्टवॉच लॉन्च केले जाऊ शकते. 

या मॉडेलमध्ये मोठे डिस्प्ले, पातळ डिझाइन आणि हेल्थ फीचर्ससह अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. सीरीज  10 च्या मोठ्या बदलांसह येत आहे. याला सध्याच्या मॉडेल्सपेक्षा मोठी स्क्रीन मिळेल. यामध्ये Apple 45mm आणि 49mm पर्याय देऊ शकते. 

फक्त IT क्षेत्रच नाही, तर आता शेतातही Ai चा वापर होणार; पीक उत्पादन वाढणार...

Apple Watch Series 10 मध्ये काही नवीन हेल्थ  आणि फिटनेस फिचरचा समावेश आहे. कंपनी सीरीज 10 साठी स्लीप एपनिया शोधण्यावर काम करत आहे. 

Apple Watch Series 10 मधील बॅटरी जुन्या मॉडेलच्या तुलनेत बदलले आहे. यामध्ये चांगले ऑप्टिमायझेशन असेल. त्यामुळे बॅटरीचा वापर कमी होईल. यामुळे घड्याळ 18 तासांपर्यंत बॅकअप देईल. Apple नवीन घड्याळात S10 चिप देऊ शकते. हे स्मार्टवॉच watchOS 11 वर चालेल, जे सध्या सार्वजनिक बीटा म्हणून उपलब्ध आहे.

कंपनीने Apple Watch Series 10 बाबत कोणतेही अपडेट दिलेले नाही आणि त्याची किंमतही जाहीर केलेली नाही. सीरीज 10 ची किंमत बेस मॉडेलसाठी सुमारे ३९९ डॉलरने सुरू होण्याची अपेक्षा आहे. हे घड्याळ ९ सप्टेंबरनंतर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असेल.

Web Title: Watch Series 10 to launch alongside iPhone Will get bigger display, upgrade chip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Apple Incअॅपल