मोबाईलवर पॉर्न बघणे असे पडू शकते महागात!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 05:04 PM2018-04-04T17:04:11+5:302018-04-04T17:04:11+5:30
उत्साहाच्या भरात अनेकजण या इंटरनेट जास्तीत जास्त पॉर्न बघण्यासाठी करतात. पण हे किती घातक ठरु शकतं याची त्यांना कल्पनाही नसते.
अलिकडे मोबाईलवर पॉर्न बघण्याचं प्रमाण अधिक वाढलं आहे. कमी पैशात मिळणारी इंटरनेट सेवा याला कारणीभूत मानता येईल. उत्साहाच्या भरात अनेकजण या इंटरनेट जास्तीत जास्त पॉर्न बघण्यासाठी करतात. पण हे किती घातक ठरु शकतं याची त्यांना कल्पनाही नसते.
तुम्ही जर स्मार्टफोनवर पॉर्न बघत असला तर तुम्ही वेळीच सावधान होण्याची गरज आहे. कारण स्मार्टफोनवर पॉर्न सिनेमे किंवा पॉर्न व्हिडीओ बघणे धोकादायक ठरू शकतं. चला जाणून घेऊया स्मार्टफोनवर पॉर्न बघणं कशाप्रकारे त्रासदायक ठरू शकतं.
इंटरनेटच्या जाळ्यात असे अनेक अॅप्स आता समोर आलेत, ज्यावर तुम्ही पॉर्न बघू शकता. पण असे अॅप स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करणं तुम्हाला महागात पडू शकतं. या अॅप्सद्वारे तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हायरस येण्याची जास्त शक्यता असते किंवा वेगवेगळ्या साईट्सवर तुम्ही गेलात तर अनेक अॅप्स अॅटोमॅटिक तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड होतात. यातून मोबाईलमध्ये व्हायरस येण्याची शक्यता असते.
* अनेक पॉर्न दाखवण्या-या वेबसाईट्स बेकायदेशीरपणे व्हॅल्यू अॅडेड सर्व्हिस जोडून जास्त पैसे कमावण्याच्या मागे असतात. अॅण्ड्रॉईड फोनवर पॉर्न वेबसाईट उघडताच VAS सर्व्हिस आपोआप तुमच्या फोनमध्ये अॅक्टीव्ह होतात. आणि याचा तुम्हाला पत्ताही लागत नाही. इतकेच नाहीतर यामुळे तुमच्या बॅलन्समधून परस्पर पैसेही कापले जाऊ शकतात.
* अॅण्ड्रॉईड फोनवर दिसणारे पॉर्न जाहीरातीचे टीकर ही एक जुनी समस्या आहे. दिसण्यात हे तसे खरे वाटतात पण युजर्स अनेकदा फसले जातात. पॉर्न टीकर हे फोनमध्ये व्हायरस पाठवण्यासाठी तयार केले जातात. पण त्यावर दिसणारी चित्रे पाहून अनेकजण त्यावर क्लिक करतात आणि चुकी करून बसतात.
* सर्वच अॅण्ड्रॉईड फोनवर कोणत्या ना कोणत्या जीमेल आयडीने लॉगीन केलं जातं. अशात जेव्हा तुम्ही ऑनलाईन पॉर्न बघत असाल तर ही माहिती पुढे कुणालाही लगेच मिळू शकते. यामुळे तुमच्या फोनची सिक्युरिटी आणि प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. याप्रकारे तुम्ही सायबर क्राईम गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू शकता.
* पॉर्न साईट्सवर काही असे व्हायरस असतात जे तुमच्या डिव्हाईसला लॉक करतात. ते अनलॉक करण्यासाठी काही बेकायदेशीर वेबसाईट तुम्हाला ब्लॅकमेल करतात आणि तुमच्याकडून पैसे उकळतात. ते तुमच्या मोबाईलमधून पर्सनल डेटाही चोरू शकतात. त्यामुळे तुम्हाला अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. यातून वाचण्यासाठी स्मार्टफोनवर पॉर्न बघणे टाळलेले बरे.