अलर्ट! 'हा' आहे सर्वात कमकुवत Password, फक्त 1 सेकंदात होऊ शकतो हॅक; चुकूनही वापरू नका अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 01:03 PM2022-02-08T13:03:40+5:302022-02-08T13:06:10+5:30

Password : लहानशीही चूक देखील मोठं नुकसान करू शकते. त्यामुळे सुरक्षित राहण्यासाठी स्ट्राँग पासवर्डचा वापर करणं गरजेचं आहे.

weak password list common password strength checker digital india | अलर्ट! 'हा' आहे सर्वात कमकुवत Password, फक्त 1 सेकंदात होऊ शकतो हॅक; चुकूनही वापरू नका अन्यथा...

अलर्ट! 'हा' आहे सर्वात कमकुवत Password, फक्त 1 सेकंदात होऊ शकतो हॅक; चुकूनही वापरू नका अन्यथा...

googlenewsNext

नवी दिल्ली - डिजिटल जगात पासवर्ड (Password) हा अत्यंत महत्त्वाचा आहे. पासवर्ड जितका स्ट्राँग असेल तितकी सर्व अकाउंट सुरक्षित राहण्यास मदत होते. मात्र सध्या फसवणुकीचं प्रमाण वाढलं असून हॅकर्सची बारीक नजर असते. लहानशीही चूक देखील मोठं नुकसान करू शकते. त्यामुळे सुरक्षित राहण्यासाठी स्ट्राँग पासवर्डचा वापर करणं गरजेचं आहे. अनेक जण साधा-सोपा लक्षात राहील असा पासवर्ड तयार करतात. सोपे पासवर्ड हॅकर्सकडून लगेच काही सेकंदात क्रॅक केले जाऊ शकतात. पासवर्ड्सवर लक्ष ठेवणारी सिक्योरिटी कंपनी ‘नॉर्डपास’ (NordPass) ने याबाबत रिपोर्ट दिला आहे.

NorPass.Com ने 2021 ची 200 टॉप कॉमन पासवर्डची (Top 200 Most Common Password) लिस्ट जारी केली आहे. अनेक लोक कित्येक वर्ष सोपा पासवर्ड वापरत असल्याचं नॉर्डपासने म्हटलंय. नॉर्डपासने या लिस्टमध्ये हे कॉमन पासवर्ड किती वेळा वापरले गेले आहेत आणि हे हॅक करण्यासाठी किती वेळ लागतो याची माहिती दिली आहे. ही लिस्ट अनेक देशांच्या पासवर्डच्या रिसर्चनंतर तयार करण्यात आली आहे. यात अनेक भारतीय पासवर्ड आहेत. भारतीय पासवर्डमध्ये अनेक लोक अतिशय कॉमन नावांचा वापर करतात. या नावांमध्ये ते ईमेल, बँक अकाउंट अशा गोष्टींचा पासवर्ड म्हणून वापर करतात.

भारतात कॉमन पासवर्ड्समध्ये 123456, india123, krishna, India123, sairam, omsairam, jaimatadi, saibaba, ganesh, abhishek, priyanka, tinkle, rajesh, deepak, lakshmi, hanuman, sweety, waheguru, hariom, balaji, jaihanuman, ganesha, godisgreat, sriram, Pankaj, Pradeep, Praveen, Rashmi, Rahul, Rajkumar, Rakesh, Ramesh, Rajesh, Sachin, Sanjay, Sandeep, Suresh, Santosh, Simran, Sandhya, Sunny, Vishal या नावांचा पासवर्डमध्ये समावेश आहेत. अशा प्रकारच्या 200 कॉमन पासवर्डची लिस्ट नॉर्डपासने जारी केली आहे.

फक्त एका सेकंदात होतो क्रॅक 

कॉमन पासवर्ड किती लोक वापरतात तसंच हा पासवर्ड क्रॅक करण्यासाठी किती वेळ लागतो हेदेखील NordPass ने सांगितलं. 123456 या पासवर्डचा वापर 25 लाखांहून अधिक लोक करतात आणि हा फक्त एका सेकंदात क्रॅक करता येऊ शकतो.

iloveyou पासवर्ड 1 लाख 6 हजारांहून जास्त लोक वापरत आहेत. हा पासवर्डही एका सेकंदात हॅक करता येतो. पासवर्ड असा password 17 लाख लोक वापरतात. हा पासवर्डही सेकंदात हॅक केला जातो.

india123 हा पासवर्ड 1.26 लाख लोक वापरतात आणि हा 17 मिनिटांत क्रॅक केला जाऊ शकतो. sairam पासवर्डचा जवळपास 50 हजार वेळा वापर केला जात आहे आणि हा पासवर्ड 2 मिनिटांत हॅक केला जाऊ शकतो. jaimatadi पासवर्ड 40 हजारांहून अधिक वेळा वापरला जात आहे आणि हा एका दिवसांत क्रॅक करता येतो.

पासवर्ड स्ट्राँग ठेवणं अतिशय गरजेचं आहे. पासवर्ड कमीत-कमी 8 शब्द-अंकांचा असावा. या 8 अंक-शब्दांमध्ये कॅपिटल-स्मॉल लेटर्स, नंबर्स, कॅरेक्टरचा समावेश असावा. तसेच आपला पासवर्ड कोणासोबतही शेअर करू नका. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: weak password list common password strength checker digital india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.