असला कसला इव्हेंट! Nothing Phone 2 मध्ये काहीच खास नाही; लोक म्हणताय, किंमत जरा अतीच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 21:55 IST2023-07-11T21:55:11+5:302023-07-11T21:55:31+5:30
Nothing Phone 2 launched, Price: Nothing Phone 1 च्या लाँचिंगवेळचा उत्साह या फोनवेळी दिसला नाही. ना डिझाईन बदलले ना फिचर्स. फक्त बदलले ते प्रोसेसर, डिस्प्ले आणि कॅमेरे.

असला कसला इव्हेंट! Nothing Phone 2 मध्ये काहीच खास नाही; लोक म्हणताय, किंमत जरा अतीच...
पहिल्या फोनची दणक्यात प्रसिद्धी झाल्याने नथिंगने दुसरा फोन आणायचे ठरविले. आज त्याचे जगभरात लाँचिंगही झाले. पण ना तामझाम ना स्टेज ना काही. मालकाने एका तज्ज्ञाला सोबत घेत वेबकॅमवर चर्चा करतात तसा इव्हेंट केला आणि एकदाचा फोन लाँच केला. सुमारे तासभर चाललेल्या या चर्चेतून नथिंगने वेगळे काही नसलेला स्मार्टफोन लाँच केल्याच्या प्रतिक्रिया नेचकऱ्यांकडून आल्या आहेत.
Nothing Phone 1 च्या लाँचिंगवेळचा उत्साह या फोनवेळी दिसला नाही. ना डिझाईन बदलले ना फिचर्स. फक्त बदलले ते प्रोसेसर, डिस्प्ले आणि कॅमेरे. परंतू, ते अन्य कंपन्यांमध्ये होतेच, असा सूर नेटकऱ्यांनी लावला आहे. तसेच ओके ओके फिचर्स देऊन कंपनी जास्त पैसे उकळत असल्याची टीकाही होत आहे.
नथिंग फोनची बॉडी ट्रान्सपरंट आहे. त्यावर आता लाईट जास्त आल्या आहेत. कव्हर लावल्यावर ती दिसणार नाही. डिझाईन बॉक्सी आहे आणि कोपरे गोलाकार आहेत. परंतू, हे काही त्या फोनला वेगळे बनवत नाहीय. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ प्लस जेन प्रोसेसर वापरण्यात आला आहे. जो वनप्लस, ओप्पो, आयक्यूच्या फोनमध्ये आहे, तो देखील कमी किंमतीत.
Nothing Phone 2 चे लाँचिंग यूट्यूबवर लाईव्ह करण्यात आले. यावर कमेंट संमिश्र होत्या. अनेकांना हा फोन ओव्हरप्राईज वाटला. Nothing Phone 2 ची सुरुवातीची किंमत ४५००० रुपयांपासून सुरु होते. ती वेगवेगळ्या मॉडेलमध्ये 54,999 रुपयांवर जाते.
हा फोन तीन कॉन्फिगरेशन आणि दोन रंग पर्यायांमध्ये लॉन्च केला आहे. 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 44,999 रुपये आहे. तर 12GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 49,999 रुपये आहे आणि टॉप व्हेरिएंट 12GB RAM + 512GB स्टोरेजसह 54,999 रुपये आहे. हा फोन व्हाइट आणि डार्क ग्रे या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Nothing Phone 2 मध्ये 6.7-इंचाचा OLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. यात सध्या चलती असलेला सोनीचा 50MP Sony IMX890 सेन्सर आहे. तसेच सोबत आणखी एक ५० मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. फ्रंटमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. 4700mAh बॅटरी दिली आहे जी 45W चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच 15W wireless | 5W reverse चार्जिंग करता येते.