पोरं मोबाइल कशासाठी वापरत आहेत? उत्तर सापडलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 06:09 AM2023-08-11T06:09:59+5:302023-08-11T06:10:46+5:30

केंद्र सरकारच्या सर्वेक्षणातून माहिती समोर

What are boys using mobile phones for? Answer found... | पोरं मोबाइल कशासाठी वापरत आहेत? उत्तर सापडलं...

पोरं मोबाइल कशासाठी वापरत आहेत? उत्तर सापडलं...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात सध्या स्मार्टफोनचा वापर मनोरंजनासाठी अधिक होत आहे. विद्यार्थीही स्मार्टफोनवर अभ्यास करण्यापेक्षा टाईमपासच अधिक करत आहेत. ग्रामीण भागात ४९.३ टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन आहे, मात्र ३४ टक्के मुलेच स्मार्टफोन अभ्यासासाठी वापरत असल्याचे एका सरकारी सर्वेक्षणातून समोर आले आहे.
ग्रामीण भारतातील प्राथमिक शिक्षणाची स्थिती-२३ या अहवालानुसार, ४० टक्के पालक मुलांसोबत त्यांच्या अभ्यासाबाबत रोज चर्चा करतात.

मुलींनी किमान पदवीधर तरी व्हावे...
देशाच्या ग्रामीण भागातील ७८ टक्के आईवडिलांना आपल्या मुलीने किमान पदवीपर्यंतचे शिक्षण तरी घ्यावे, अशी इच्छा असते.  ८२ टक्के पालकांना मुलाने किमान पदवी किंवा त्यापुढील शिक्षण घ्यावे, असे वाटते. काही कारणांमुळे शिक्षण घेऊ शकत नाहीत, अशी एक चतुर्थांश मुले प्राथमिक वर्गातूनच शाळेबाहेर येतात, असेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

७६.७% 
गेम खेळतात

४७.३% 
गाणे ऐकणे

५६.६% 
व्हिडीओ पाहणे 

३४.९% 
अभ्यास करणे 

१०.९% 
चॅटिंग

कोण मार्गदर्शन करते?
२५.६% 
भाऊ, बहीण अभ्यासासाठी मदत करतात.
३.८%
मुलांना अंगणवाडी सेविका मदत करतात.
७.६%
मोठ्या लोकांचे मार्गदर्शन 

मुले फोन किती वापरतात? 
७३% 
मुले रोज किमान २ तास फोनचा वापर करतात.
८वी इयत्तेपेक्षा 
मोठ्या वर्गातील २५.४ टक्के मुले 
रोज २ ते ४ तास मोबाईल वापरतात.
१६.८% 
१ ते ३ पर्यंतची 
मुलेही २ ते ४ तास मोबाईलवर वेळ घालवतात.

Web Title: What are boys using mobile phones for? Answer found...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल