Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! सोनू सूद देणार तब्बल 1 लाख लोकांना नोकऱ्या; जाणून घ्या, कसा आणि कुठे करायचा अर्ज?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 11:49 AM2021-03-17T11:49:04+5:302021-03-17T12:03:26+5:30
Sonu Sood will give job to 1 lakh people : सोनू बेरोजगारांच्या मदतीला धावून आला असून त्यांच्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. आता तर त्याच्या एका गोष्टीमुळे 10 कोटी लोकांचं आयुष्य बदलणार आहे.
नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात लोकांना मदत करण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) कोरोनाच्या या लढ्यात हजारो लोकांना मदतीचा हात दिला. गेल्या काही महिन्यांपासून अनेक प्रवाशांना घरी पोहोचवून त्यांची मदत केली आहे. लॉकडाऊन दरम्यान मुंबईतून दुसऱ्या राज्यात आपल्या गावी जाणाऱ्यांसाठी सोनू सूद हा सुपरहिरोच ठरला. या लोकांना मदत करण्याचं त्याचं हे काम अजूनही थांबलेलं नाही. आताही तो कित्येकांना रोजगार मिळवून देण्यासाठी धडपडत आहे. यावेळी सोनू बेरोजगारांच्या मदतीला धावून आला असून त्यांच्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. आता तर त्याच्या एका गोष्टीमुळे 10 कोटी लोकांचं आयुष्य बदलणार आहे. Sonu Sood will give job to 1 lakh people
सोनूने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्याचा एक महत्त्वकांक्षी प्लॅन लोकांसोबत शेअर केला आहे. तो आता एक लाख लोकांना नोकरी देण्यासाठी एक प्लॅन आखत आहे. त्याच्या या ट्वीटमुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. "नवीन वर्ष.... नवीन स्वप्नं... नवीन नोकरीच्या संधी... आणि आम्ही आता तुम्हाला नोकरीची संधी देणार आहोत... गुडवर्कर हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करा आणि तुमचे भविष्य उज्जवल करा..." असं सोनूने ट्विटमध्ये म्हटलं आहे. सोनूने या अॅप्लिकेशनला डाऊनलोड करण्यासाठी एक लिंक दिली आहे. या अॅपद्वारे 10 कोटी लोकांचे आयुष्य बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नोकरी शोधणारे युवक सोनूचे हे ट्वीट पाहून प्रचंड खूश झाले आहेत. सोनूच्या या प्रयत्नसाठी अनेकांनी सोशल मीडियाद्वारे सोनूचे आभार मानले आहेत.
नया साल, नई उम्मीदें
— sonu sood (@SonuSood) March 14, 2021
नई नौकरी के अवसर....
और उन अवसरों को आपके करीब लाते, नए हम।
प्रवासी रोज़गार अब है गुडवर्कर।
आज ही गुडवर्कर एप्लिकेशन को डाउनलोड करें और बेहतर कल की उम्मीद करें
App Link: https://t.co/GMX1RW36s5#AbIndiaBanegaKaamyaab#GoodWorker#NaukriPaanaHuaAasaanpic.twitter.com/yV6XTZ5RtD
काय आहे गुडवर्कर अॅप?
- गुडवर्कर अॅप हे एक नोकरी (Job) मिळवण्यासाठी मदत करणारे अॅप्लिकेशन आहे.
- देशातील प्रवासी मजुरांना नोकरी मिळवून देण्यासाठी हे अॅप तयार करण्यात आले आहे.
- बेरोजगार असलेले आणि नोकरीसाठी वणवण भटकणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी हे अॅप आहे.
- लाखो लोकांना जॉब लिंकेज आणि करिअरसाठी मदत करणं हा गुडवर्कर अॅपचा मुख्य उद्देश आहे.
- हे अॅप अत्यंत सुरक्षित असून, त्यात कोणतीही फसवणूक होणार नाही, असा दावा करण्यात आला आहे.
गुडवर्कर अॅप कसं काम करतं.
- नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना आता घरबसल्या नोकरी शोधता येणार आहे.
- गुडवर्कर हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी http://bit.ly/GoodWorkerApp वर क्लिक करा आणि ते डाऊनलोड करा.
- या अॅपवर युजर्सना मोफत आपला बायोडेटा तयार आणि शेअर करता येणार आहे. आपल्या भाषेत बायोडेटा तयार केला नंतर त्याचं इंग्रजी भाषेत भाषांतर केलं जाईल. नंतर तो तो कंपन्यांकडे पाठवला जाणार आहे
- जॉब मॅचिंग टूलच्या माध्यमातून योग्य नोकरीची माहिती अर्ज करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
- तुम्ही ज्या गावात तुम्ही राहात असाल किंवा जिथं नोकरीच्या शोधात असाल त्या ठिकाणच्या नोकऱ्यांबाबत माहिती दिली जाईल.
- एखाद्या कंपनीत नवीन कामगार भरती होत असेल तर त्याची माहिती हे अॅप देईल. तुमचं राहण्याचं ठिकाण आणि पात्रता यानुसार योग्य नोकऱ्यांची माहिती दिली जाईल.
- एखाद्या ठिकाणी तुमची निवड झाली तर तिथल्या मुलाखतीबाबत सर्व माहिती म्हणजे मुलाखत कधी, कुठे, किती वाजता, पगार, कंपनीच्या संबधित अधिकाऱ्याचा फोन नंबर, ईमेल आयडी अशा सर्व गोष्टींची माहिती दिली जाईल.
- गुडवर्कर अॅपवरून तुम्हाला नोकरी मिळाली तर कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र दिलं जाईल. ज्यामुळं दुसऱ्या ठिकाणी काम मिळणं सोपं जाईल. हे अॅप ही सर्व सेवा मोफत देत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.