स्मार्टफोन हरवला तर...?; यूझर्स करू शकतात ट्रॅक, पुढील गोष्टी लगेच करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 03:04 PM2022-02-04T15:04:31+5:302022-02-04T15:54:05+5:30
स्मार्टफोन हरवला तर जिवाची तगमग होते.
हाताच्या तळव्यावर विसावणारा स्मार्टफोन आजकाल प्रत्येकासाठी प्राणप्रिय झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये खास आठवणींच्या अल्बमपासून पैशाच्या व्यवहारापर्यंत सर्व काही सामावलेले असते. थोडक्यात स्मार्टफोन हा सब कुछ असतो. स्मार्टफोन हरवला तर जिवाची तगमग होते.
या गोष्टी लगेच करा-
- स्मार्टफोन हरवला किंवा चोरीला गेला तर सर्वप्रथम सत्यता तपासा.
- शक्यतो हरवलेला वा चोरीला गेलेला मोबाइल परत मिळतोच असे नाही. त्यामुळे त्यासंदर्भात पोलिसांत प्राथमिक तक्रार दाखल करा.
- हरवलेला मोबाइल कोणाला सापडू शकतो असे गृहीत धरून मोबाइलवर कॉल करून बघा. एखाद्या सुहृुदाने तो जपून ठेवला असेल तर परत मिळेल.
आयफोन यूझर्स करू शकतात ट्रॅक-
- आयफोन हरवला असेल तर तो शोधणे सोपे आहे.
- सर्वप्रथम ज्याचा आयफोन हरवला आहे त्या व्यक्तीने दुसऱ्या डिव्हाइसवर आपला ॲपल आयडी टाकून लॉग-इन करावे.
- त्यानंतर ‘लॉस्ट मोड’ सक्रिय करावे ‘फाइण्ड माय आयफोन’ या फीचरचा वापर करावा.
- ‘फाइण्ड माय नेटवर्क’च्या मदतीने आयफोन स्विच-ऑफ झाल्याच्या २४ तासांनंतर त्याचा माग काढला जाऊ शकतो.
- तुमच्याकडे अन्य कोणते ॲपल डिव्हाइस नसल्यास आयक्लाऊड डॉट कॉमवर जाऊन या सर्व फीचर्सचा वापर करता येतो.
अँड्रॉइड फोनच्या यूझर्ससाठी-
- तुमच्याकडे आयफोनऐवजी अँड्रॉइड फोन असेल तर त्यासाठी ‘फाइण्ड माय आयफोन’ या फीचरचा वापर करा.
- तुमच्या हरवलेल्या फोनचे जीपीएस फीचर ऑन असेपर्यंतच लोकेशन ट्रॅकिंग सर्व्हिस उपयुक्त ठरू शकणार आहे.
- अन्यथा अँड्रॉइड डॉट कॉम स्लॅश फाइण्ड यावर साइन करूनही फोनचा तपास करता येऊ शकेल.