५जी युगात आपला फायदा काय? जगणे आणखी सुलभ अन् गतिमान!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 06:36 AM2022-10-02T06:36:03+5:302022-10-02T06:36:34+5:30

इंटरनेटचा वेग इतका वाढणार की रोजची ८० टक्के कामे ही तंत्रज्ञान चुटकीसरशी होतील.

what is our advantage in the 5G era living even easier and faster | ५जी युगात आपला फायदा काय? जगणे आणखी सुलभ अन् गतिमान!

५जी युगात आपला फायदा काय? जगणे आणखी सुलभ अन् गतिमान!

googlenewsNext

कसलेही सेटिंग न करता तुमचा अलार्म आपोआप वाजतो... अंघोळीच्या वेळेआधीच गिझर सुरू होतो, गरम पाणी तयार असते... चहाच्या वेळेआधी फ्रीज कळवतो की, दूध लवकरच संपणार आहे... हॉलमध्ये जाताच लाईट, पंखे आणि एसी आपोआप सुरू होतात... ऑफिस वा शाळेची वेळ झाली की घरच्या घरीच मेटावर्सवर लॉग इन करायचे... की काम सुरू तुमचा आभासी (व्हर्च्युअल) अवतार ऑफिसात जातो, मीटिंग्सना हजर राहतो... घरातून बाहेर पडायचे असेल तर गुगल मॅप्स रिअल टाईम नॅविगेशन सांगतो... तुमच्या कारपुढे कोणती गाडी चालत आहे, डावीकडे किंवा उजवीकडे किती वळायचे आहे, हे ही अचूकपणे सांगतो... हो... हो...  ५जी सेवेमुळे हे सर्व काही शक्य होणार आहे. 

कॉल ड्रॉप होणार नाहीत:५जीचा विस्तार करण्यासाठी कंपन्यांना पायाभूत सुविधांमध्ये वाढ करावी लागेल. टॉवर्सची संख्याही वाढवावी लागेल. त्यामुळे नेटवर्क मिळण्यात फारशा अडचणी येणार नाहीत आणि सतत कॉल ड्रॉप होण्याच्या समस्येतून सुटका मिळू शकते. 

डाऊनलोडिंग वेगाने: भारतात ५०० एमबी प्रतिसेकंद इतका स्पीड मिळू शकला तरी २ जीबीची मूव्ही चार सेकंदात डाऊनलोड करता येईल. ऑनलाइन मूव्ही विनाबफरिंग पाहता येईल. 

इंटरनेट हाेणार वेगवान 

- ७० देशांमध्ये पूर्ण रुपात किंवा अंशत: ५जी सेवा सुरू आहे. 

- दक्षिण कोरियामध्ये इंटरनेटचा स्पीड सर्वाधिक म्हणजेच १ जीबी प्रतिसेकंद इतका आहे. 

- भारतात ४जीच्या पायाभूत सुविधांच्या आधारे जरी ५जी सेवा दिली तरी इंटरनेटचा वेग निश्चितपणे वाढेल. भारतात हा वेग सध्या केवळ १४ एमबी प्रतिसेंकद इतका आहे. 

व्हिडीओ कॉल अडकणार नाही 

- सध्या व्हिडीओ कॉलमध्ये व्हिडीओ अडकतो किंवा गायब होतो. ५जीमुळे हे होणार नाही. 

- व्हिडीओ कॉल तत्काळ जोडला जाईल. व्हिडीओ कॉल एचडी मूव्हीप्रमाणे अगदी स्पष्ट दिसेल. 

व्हिडीओ तत्काळ अपलोड 

- सोशल मीडियावर रिल्स किंवा व्हिडीओ अपलोड होण्यासाठी खूप कमी वेळ लागेल. 
- अपलोडिंगचा कमाल वेग ४०० एमबी प्रतिसेकंद इतका मिळतो. यामुळे व्हाॅटसॲप, टेलिग्रामवर एखादा व्हिडीओ किंवा फोटो पाठवणे सोपे होणार आहे. 

ऑनलाइन गेमर्सची चंगळ

- ५जी सेवा गेमिंगसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरणार आहे. गेमिंगमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. 

- नेटवर्क लेटेंसी खूप कमी होईल. ॲक्शन गेम थांबून थांबून चालणार नाहीत. 

- व्हिडीओ, मूव्ही आणि गेमिंगचा वेग वाढेल. रोबोटिक सर्जरी १०० टक्के अचूकपणे करता येणार आहे. एखाद्या तज्ज्ञाशी व्हर्च्युअली कनेक्ट होता येईल.

८०% रोजची कामे चुटकीसरशी 

- इंटरनेटचा वेग इतका वाढणार की रोजची ८० टक्के कामे ही तंत्रज्ञान चुटकीसरशी होतील.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: what is our advantage in the 5G era living even easier and faster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :5G५जी