'Vine' ॲप पुन्हा सुरू होणार, Tiktok सारखा प्लॅटफॉर्म असणार? Elon Musk यांच्याकडून संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 10:45 AM2022-11-01T10:45:25+5:302022-11-01T10:52:43+5:30

Vine App : पोलद्वारे इलॉन मस्क यांनी वाइनला परत आणायचे का, असा प्रश्न युजर्सना विचारला आहे.

what is vine app an alternative of tiktok | 'Vine' ॲप पुन्हा सुरू होणार, Tiktok सारखा प्लॅटफॉर्म असणार? Elon Musk यांच्याकडून संकेत

'Vine' ॲप पुन्हा सुरू होणार, Tiktok सारखा प्लॅटफॉर्म असणार? Elon Musk यांच्याकडून संकेत

googlenewsNext

नवी दिल्ली : ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क (Elon Musk) हे व्हिडिओ ॲप वाइन (Vine) पुन्हा लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. इलॉन मस्क यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक Bring Back Vine? च्या नावाने पोल पोस्ट केली आहे. या पोलद्वारे इलॉन मस्क यांनी वाइनला परत आणायचे का, असा प्रश्न युजर्सना विचारला आहे. इलॉन मस्क यांच्या या ट्विटवर अनेक युजर्सनी मत दिले, तर अनेक युजर्सनीही ट्विट करून आपले विचार सुद्धा मांडले आहेत.

इलॉन मस्क यांचे हे ट्विट Vine च्या पुनरागमनाकडे इशारा करत आहे. एका यूजरने ट्विट करून लिहिले की, 'मला वाटते की वाइनला परत आणणे ही चांगली कल्पना असेल. दरम्यान, एकेकाळी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करण्यासाठी फक्त Vine ॲपचा वापर केला जात होता. ट्विटरने ऑक्टोबर 2012 मध्ये Vine ॲप विकत घेतल्याचे वृत्त आहे. या ॲपचे 200 मिलियनहून अधिक ॲक्टिव्ह मंथली युजर्स होते. 

प्लॅटफॉर्मने आपल्या स्थापनेपासून 1.5 बिलियन लूप पाहिले आहेत. Vine नावाच्या या ॲपवर 6 सेकंदाची लूपिंग व्हिडीओ क्लिप शेअर केली जाऊ शकत होती, परंतु कंपनीने 2016 मध्ये Vine ॲपची सेवा बंद केली. नंतर ते Vine कॅमेरामध्ये बदलण्यात आले. Vine कॅमेरा ॲपमध्ये युजर्संना 6.5 सेकंदांचा लूपिंग व्हिडिओ शूट करण्यासाठी मिळत होते.

Vine बनणार TikTok सारखे प्लॅटफॉर्म?
ट्विटरचे मालक झाल्यानंतर इलॉन मस्क यांची कर्मचाऱ्यांसोबत पहिल्यांदाच चर्चा केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बैठकीत या विषयावर चर्चा करताना इलॉन मस्क म्हणाले की, आम्हाला Tiktok सारखे ॲप म्हणून Vine विकसित करायचे आहे, जिथे 'अपमानास्पद टिप्पण्या' देखील परवानगी दिली जाऊ शकते. मात्र, यासोबतच इलॉन मस्क यांनी अशा कमेंट्सचा प्रचार करू नये, असेही स्पष्ट केले आहे. तसेच, इलॉन मस्क यांनी आपल्या ट्विटर कर्मचार्‍यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, एक बिलियन युजर्सपर्यंत पोहोचण्याचे आमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्हाला TikTok सारखे प्लॅटफॉर्म बनवावे लागेल.

Web Title: what is vine app an alternative of tiktok

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.