स्मार्टफोनच्या तळाला असलेल्या हा छोटा होल बुजवला तर? याचा उपयोग तरी काय?; जाणून घ्या  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 11:57 AM2021-12-18T11:57:15+5:302021-12-18T11:59:30+5:30

Tiny Hole Next To The Charging Port: तुमच्या स्मार्टफोनच्या चार्जिंग पोर्टच्या बाजूला एक छोटासा होल आहे का? त्याचा उपयोग काय असा प्रश्न पडला आहे का? चला जाणून घेऊया याचं महत्व.  

What is the use of tiny hole under your smartphone  | स्मार्टफोनच्या तळाला असलेल्या हा छोटा होल बुजवला तर? याचा उपयोग तरी काय?; जाणून घ्या  

स्मार्टफोनच्या तळाला असलेल्या हा छोटा होल बुजवला तर? याचा उपयोग तरी काय?; जाणून घ्या  

googlenewsNext

एका स्मार्टफोनमध्ये मिळणारे काही फीचर्स ठरलेले असतात. यात पॉवर बटन, व्हॉल्युम बटन, चार्जिंग पोर्ट, फ्रंट कॅमेरा, स्पीकर, इयरपीस आणि रियर कॅमेरा या गोष्टींचा समावेश असतोच. परंतु त्याचबरोबर एक खूप छोटासा होल स्मार्टफोनच्या तळाला दिला जातो. अनेकांना हा होल का दिला असावा असा प्रश्न पडतो. हा फक्त होल नाही तर हा स्मार्टफोनसाठी खूप महत्वाचा आहे.  

अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर हा एक माईक आहे. परंतु हा फक्त समोरच्या व्यक्तीपर्यंत तुमचा आवाज पोहोचवण्याचं काम करत नाही तर नॉइज कॅन्सलेशनचं देखील काम करतो. हे फिचर कॉलिंगच्या वेळी अ‍ॅक्टिव्हेट होते. यामुळे तुमचा आवाज स्पष्टपणे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. नॉइज कॅन्सलेशनमध्ये तुमच्या आजूबाजूचा आवाज कमी केला जातो आणि तुमच्या आवाजावर जास्त भर दिला जातो.  

त्यामुळे हा होल जर तुम्ही बुजवला, त्यावर हात ठेवला किंवा त्यात काही अडकलं तर कॉलमध्ये तुमचा आवाज कमी होऊ शकतो. किंवा बॅकग्राऊंड नॉइज वाढून तुमचा आवाज त्यात दबून जाऊ शकतो. म्हणून हा होल नेहमी क्लियर असणं आवश्यक आहे. 

हे देखील वाचा: 

स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीवर मिळतेय भरघोस सूट; OnePlus 9 सीरीजवर 8,000 रुपयांपर्यंतची बचत

शाओमीच्या अडचणीत वाढ; भारतात येतोय Realme चा ढासू स्मार्टफोन  

Web Title: What is the use of tiny hole under your smartphone 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.