लाखाचा आयफोन! या पैशांत काय काय होऊ शकते माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 12:48 PM2018-09-14T12:48:40+5:302018-09-14T12:49:41+5:30

भारतात मोबाईल युग आले तेव्हा काही हजारात असलेले मोबाईल फोन महाग वाटत होते. नोकिया, ब्लॅकबेरीच्या बटन असलेल्या फोननंतर टच स्क्रीनवाल्या आयफोनची क्रेझ आली. आज या आयफोनची किंमत लाखाच्या घरात आहे.

what we can get in the price of new iphone's | लाखाचा आयफोन! या पैशांत काय काय होऊ शकते माहितीये?

लाखाचा आयफोन! या पैशांत काय काय होऊ शकते माहितीये?

googlenewsNext

भारतात मोबाईल युग आले तेव्हा काही हजारात असलेले मोबाईल फोन महाग वाटत होते. नोकिया, ब्लॅकबेरीच्या बटन असलेल्या फोननंतर टच स्क्रीनवाल्या आयफोनची क्रेझ आली. आज या आयफोनची किंमत लाखाच्या घरात आहे. मात्र, तरीही ही किंमत अॅपलप्रेमींना काही जास्त वाटत नाही.


बुलेट भारतात आलेली तेव्हाही तिची किंमत लाखातच होती. मात्र, त्यावेळी बुलेट घेण्याऐवजी तेच पैसे रॉयल एनफिल्डचे शेअर घेण्यासाठी वापरले असते तर आज करोडपती झाला असता. असेच काहीसे आयफोनचेही आहे. नुकताच लाँच झालेला आयफोन एक्सएस आणि मॅक्स यांची किंमत 1 लाख ते 1.1 लाखापर्यंत आहे. एवढी मोठी किंमत मोजून आयफोन विकत घेण्यात काय हशील...होय बरोबर आहे. आयफोनच्या याच पैशांत आपण काय काय करू शकतो याची कल्पना तरी आहे का....चला पाहूया.

 

  • या लाखभर रुपयांत तुम्ही आजच्या दराप्रमाणे तब्बल 21 महिन्यांचे पेट्रोल भरू शकता. दिवसा 2 लीटर असे याचे प्रमाण आहे. त्याहूनही कमी पेट्रोल लागत असेल तर हे महिने काही वर्षांमध्ये बदलू शकतात. मात्र, आयफोनसमोर 21 महिन्यांचे पेट्रोलची किंमत काय असे म्हणणाऱ्यांना हे काही रुचणार नाही. 

 

  • दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, आज काल आरोग्य विमा सर्वांचाच असतो. मात्र, तो केवळ आजारांसाठी उपयोगी पडतो. नियिमत औषधोपचाराचा खर्च यातून मिळत नाही. यामुळे या आयफोनच्या किंमतीत तुम्ही तब्बल 14 वर्षे 589 रुपये प्रतिमहिना या प्रमाणे औषधोपचाराचा खर्च चालवू शकता. 
     
  • देशात एका भारतीय कुटुंबाचा हॉटेलमध्ये नाष्टा, जेवणाचा वार्षिक खर्च 6500 रुपये आहे. एक लाख रुपयांत आपण किती वर्षे हॉटेलमध्ये जेवू शकतो. महिन्यांचा विचार केल्यास 6500 रुपयांप्रमाणे 15 महिने आपण हॉटेलमध्ये जाऊ शकतो.
     
  • रोजच्या कामाचा कंटाळा आला की, कुठेतरी बाहेर फिरायला जावेसे वाटते. परंतू त्यासाठी पैसेही लागतात. एका ट्रीपचा खर्च 6358 रुपये पकडल्यास आपण एक लाखाच्या आयफोनऐवजी 16 वेळा फिरायला जाऊ शकतो. 
     
  • नोकरीच्या निमित्ताने आपल्याला बऱ्याचदा वेगवेगळ्या शहरांमध्ये जावे लागते. तेथे घर विकत घेणे शक्य नसते. यामुळे मुंबई, पुणे सारख्या शहरामध्ये 8 ते 10 हजार रुपये भाडे असलेले घर पाहतो. या लखपती आयफोनच्या किंमतीमध्ये आपण 10 ते 12 महिन्यांचे भाडे चुकवू शकतो. 

Web Title: what we can get in the price of new iphone's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.