Reliance AGM 2019: जिओचा सेट टॉप बॉक्स म्हणजे 'अल्लाउद्दीनचा दिवा'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 07:02 PM2019-08-12T19:02:22+5:302019-08-12T19:11:06+5:30

700 रुपयांपासून सुरू होणाऱ्या या सेवेमध्ये काय काय मिळणार हे 5 सप्टेंबरलाच समजणार असले तरीही आम्ही काही माहिती घेऊन आलो आहोत. 

what you will get in Reliance jio's gigaFiber? set top box, tariff plans and much more | Reliance AGM 2019: जिओचा सेट टॉप बॉक्स म्हणजे 'अल्लाउद्दीनचा दिवा'

Reliance AGM 2019: जिओचा सेट टॉप बॉक्स म्हणजे 'अल्लाउद्दीनचा दिवा'

Next

जवळपास एक वर्षाने रिलायन्सने बहुप्रतिक्षित जिओफायबर सेवेची घोषणा केली आहे. ही सेवा जरी 5 सप्टेंबरपासून सुरू होणार असली तरीही ग्राहकांमध्ये इंटरनेट स्पीड, दर आदीबाबत उत्सुकता आहे. 700 रुपयांपासून सुरू होणाऱ्या या सेवेमध्ये काय काय मिळणार हे 5 सप्टेंबरलाच समजणार असले तरीही आम्ही काही माहिती घेऊन आलो आहोत. 


जिओफायबरची किंमत : जिओफायबरचे दर 700 रुपयांपासून सुरू होणार आहेत. 10 हजार रुपयांपर्यंत हे प्लॅन आहेत. यामध्ये वार्षिक पॅकेजची माहिती देण्यात आलेली नाही. 


जिओफायबरचा वेग : जिओफायबरच्या ग्राहकांना कमीतकमी 100Mbps चा वेग मिळणार आहे. तर टॉप स्पीड 1Gbps असेल. 
जिओफायबर सेट टॉप बॉक्स : वाय फाय राऊटरसोबत जिओच्या ग्राहकांना मोफत सेटटॉप बॉक्स मिळणार आहे. शिवाय 4 के टीव्हीही मिळणार आहे. सेटटॉप बॉक्समध्ये व्हिडिओ कॉलिंगसारखे फिचरही मिळेल. 


एकावेळी चार लोकांना व्हिडिओ कॉलिंग करता येणार आहे. सोबत ग्राहकांच्या फोन आणि टॅबवरूनही मोफत व्हिडिओ कॉल करता येणार आहेत. 


जिओच्या सेटटॉप बॉक्समध्ये कंन्सोल क्वालिटी गेमिंग मिळणार आहे. यामुळे फिफा 2019 सारखे गेम खेळण्यासाठी इनबिल्ट ग्राफिक्स कार्डही असेल. नंतर यावर Tencent आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांचे गेमही उपलब्ध होतील.

Web Title: what you will get in Reliance jio's gigaFiber? set top box, tariff plans and much more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.