WhatsApp वर लवकरच एकाच वेळी 30 ऑडिओ क्लिप पाठवता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 09:42 AM2019-01-09T09:42:17+5:302019-01-09T10:20:49+5:30

WhatsApp वर लवकरच एकाच वेळी 30 ऑडिओ क्लिप पाठवणं शक्य होणार आहे. या नव्या अपडेट फीचरमुळे युजर्सला ऑडिओ क्लिप पाठवणे आणखी सोपे होणार आहे.

whatsapp for android to get new audio file based feature | WhatsApp वर लवकरच एकाच वेळी 30 ऑडिओ क्लिप पाठवता येणार

WhatsApp वर लवकरच एकाच वेळी 30 ऑडिओ क्लिप पाठवता येणार

Next
ठळक मुद्देWhatsApp वर लवकरच एकाच वेळी 30 ऑडिओ क्लिप पाठवणं शक्य होणार आहे.नव्या अपडेट फीचरमुळे युजर्सला ऑडिओ क्लिप पाठवणे आणखी सोपे होणार आहे.WhatsApp च्या अॅन्ड्रॉईड App (व्हर्जन 2.19.1) बीटा व्हर्जनवर हे नवीन फीचर मिळणार आहे.

नवी दिल्ली - WhatsApp हे लोकप्रिय माध्यम आहे. युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर होण्यासाठी WhatsApp सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. 2019 या नववर्षात WhatsApp वर PiP मोड, डार्क मोड, ग्रुप कॉल शॉर्टकट यासह अनेक भन्नाट फीचर्स येणार आहेत. याच यादीत आता आणखी एका फीचरचा समावेश होणार आहे. WhatsApp वर लवकरच एकाच वेळी 30 ऑडिओ क्लिप पाठवणं शक्य होणार आहे. या नव्या अपडेट फीचरमुळे युजर्सला ऑडिओ क्लिप पाठवणे आणखी सोपे होणार आहे.

‘WABetaInfo’ ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून WhatsApp वर होणाऱ्या या नव्या बदलाबाबत माहिती दिली आहे. WhatsApp च्या Android App (व्हर्जन 2.19.1) बीटा व्हर्जनवर हे नवीन फीचर मिळणार आहे. WhatsApp आपल्या कॉन्टॅक्टना ऑडिओ क्लिप पाठवण्याची पद्धत बदलण्यावर काम करत आहे. यामध्ये ऑडिओ क्लिपचा ऑडिओ प्रिव्ह्यू आणि इमेज प्रिव्ह्यू दिसणार आहे. तसेच एकाचवेळी 30 ऑडिओ क्लिप पाठवता येणे शक्य होणार आहे. WhatsApp वर लवकरच हे फीचर येणार आहे. 



WhatsApp वर 2019 मध्ये येणार 'ही' खास फीचर्स

WhatsApp वर काहीही डिलीट न करता असं लपवा पर्सनल चॅट

WhatsApp वर ऑडिओ क्लिपबाबतचे फिचर कसे असेल याबाबत एक फोटोही पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोमध्ये ऑडिओ क्लिप पाठवण्याची पद्धत आता पेक्षा थोडी वेगळी दिसत आहे. तसेच एकाचवेळी 30 क्लिप निवडण्याचे चिन्हंही दिसत आहे. आयओएसवर हे फीचर उपलब्ध करणार आहे. WhatsApp ने काही दिवसांपूर्वीच  PiP (पिक्चर-इन-पिक्चर) हे फीचर सुरू केले आहे. यामध्ये  युजर्सला चाटिंगमध्येच कोणतेही यूट्यूब किंवा फेसबुकचे व्हिडीओ पाहायला मिळतात.

 

Web Title: whatsapp for android to get new audio file based feature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.