व्हॉट्सअॅपवर आलेले फोटो व व्हिडीओ आता गॅलरीमध्ये हाइड करणं शक्य, जाणून घ्या नवं फीचर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 11:41 AM2018-05-28T11:41:24+5:302018-05-28T11:41:24+5:30
युजरला व्हॉट्सअॅप मीडिया कॉन्टेन्ट गॅलरीमध्ये 'हाइड' किंवा 'शो' करायचा पर्याय आहे.
मुंबई- व्हॉट्सअॅपने अॅन्ड्रॉइडच्या नव्या बिटा व्हर्जनमध्ये एक नवं फीचर आणलं आहे. मीडिया व्हिजिबिलिटी असं हे नवं फीचर आहे. हे नवं फीचर बिटा अॅपच्या 2.18.159 व्हर्जनवर उपलब्ध आहे. हे फीचर आल्यानंतर युजरला व्हॉट्सअॅप मीडिया कॉन्टेन्ट गॅलरीमध्ये 'हाइड' किंवा 'शो' करायचा पर्याय मिळेल. बिटा व्हर्जनमध्ये नवं कॉन्टेन्ट शॉर्टकटही आलं आहे, ज्यामुळे व्हॉट्सअॅपने कुठल्याही नव्या कॉन्टेन्टला अॅड करणं सोपं होईल.
मीडिया व्हिजिबिलिटी फीचरमुळे आता युजर्सला व्हॉट्सअॅपवर आलेले फोटो आणि व्हिडीओ फोन गॅलरीमध्ये दिसू द्यायचे की नाही हे ठरवता येणार आहे. याचाच अर्थ जर युजरने मीडिया व्हिजिबिलीटी फीचर डिसेबल केलं तर व्हॉट्सअॅपवरील कॉन्टेंट मोबाइल गॅलेरीमध्ये दिसणार नाही. पण व्हॉट्सअॅपवरील कॉन्टेन्ट थेट व्हॉट्सअॅपवरून वापरता येईल.
मीडिया व्हिजिबिलिटी फीचर व्हॉट्सअॅपच्या बिटा व्हर्जनमध्ये बाय डिफॉल्ट अनेबल आहे. पण व्हॉट्सअॅप सेटिंगमध्ये जाऊन ते डिसेबल करता येईल. हे फीचर डिसेबल केल्यावर व्हॉट्सअॅपवरून डाऊनलोड केलेले फोटो व व्हिडीओ गॅलरीमध्ये दिसणार नाहीत. पण मोबाइलमधील फाइल मॅनेजरमध्ये व्हॉट्सअॅप इमेजच्या फोल्डरमध्ये ते दिसेल.