WhatsApp चा लाखो युजर्सना झटका! 23 लाखांहून अधिक अकाऊंटवर घातली बंदी, 'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 02:22 PM2022-09-02T14:22:47+5:302022-09-02T14:27:56+5:30
WhatsApp News : WhatsApp ने आपल्या लाखो युजर्सना मोठा धक्का दिला आहे. जुलैमध्ये भारतातील 23 लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली.
WhatsApp हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. मात्र आता WhatsApp ने आपल्या लाखो युजर्सना मोठा धक्का दिला आहे. नवीन आयटी नियम 2021 अंतर्गत जुलैमध्ये भारतातील 23 लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली. कंपनीने गुरुवारी ही माहिती दिली. भारतात जुलै महिन्यात WhatsApp वर 574 तक्रारी आल्या आणि 27 वर कारवाई करण्यात आली. देशातील 40 कोटींहून अधिक युजर्स असलेल्या या प्लॅटफॉर्मने जूनमध्ये खराब रेकॉर्ड असलेल्या 22 लाखांहून अधिक अकाऊंटवर बंदी घातली होती.
कंपनीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, IT नियम 2021 नुसार, आम्ही जुलै 2022 साठी आमचा रिपोर्ट प्रकाशित केला आहे. मासिक रिपोर्टमध्ये नोंदवल्याप्रमाणे, WhatsApp ने जुलै महिन्यात 2.3 मिलियन म्हणजेच 23 लाखांहून (2387,000) अधिक अकाऊंटवर बंदी घातली आहेत.
माहिती तंत्रज्ञान नियम 2021 च्या 4(1) (d) नुसार प्रकाशित, अहवालात भारतातील युजर्सकडून आलेल्या तक्रारींवर WhatsApp ने केलेल्या कारवाईचा डेटा आहे. तक्रार यंत्रणेद्वारे आक्षेप प्राप्त झाले आणि सेवा अटींचे उल्लंघन केल्याबद्दल अकाऊंटवर कारवाई करण्यात आली आहे. IT नियम 2021 अंतर्गत, 50 लाखांहून अधिक युजर्स असलेल्या प्रमुख डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने मासिक रिपोर्ट प्रकाशित करणे आवश्यक आहे.
कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “एंड-टू-एंड एनक्रिप्टेड मेसेजिंग सेवांमधील गैरवापर रोखण्यासाठी Whatspp अग्रणी आहे. वर्षानुवर्षे, आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर आमच्या युजर्सना सुरक्षित ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेटा प्रक्रियांमध्ये गुंतवणूक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.