अरे बापरे! WhatsApp ने भारतात बॅन केले ८५ लाखांहून अधिक अकाऊंट्स, करू नका 'ही' चूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 04:42 PM2024-11-04T16:42:14+5:302024-11-04T16:42:45+5:30

भारतातील लाखो WhatsApp अकाउंट्सवर बंदी घातली आहे.

WhatsApp banned more than 85 lakh accounts in india in september say report | अरे बापरे! WhatsApp ने भारतात बॅन केले ८५ लाखांहून अधिक अकाऊंट्स, करू नका 'ही' चूक

अरे बापरे! WhatsApp ने भारतात बॅन केले ८५ लाखांहून अधिक अकाऊंट्स, करू नका 'ही' चूक

WhatsApp हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. पण आता कंपनीने पॉलिसीचं उल्लंघन करणाऱ्या भारतातील लाखो WhatsApp अकाउंट्सवर बंदी घातली आहे. युजर्सची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि गैरवापर रोखण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचललं आहे. कंपनीने आपल्या पॉलिसीचं उल्लंघन केल्याबद्दल सप्टेंबरमध्ये भारतात ८.५ मिलियन (जवळपास ८५ लाख) मलिशियस अकाऊंट्सवर बंदी घातली. नवीन आयटी नियम २०२१ अंतर्गत WhatsApp ने आपल्या मंथली कम्प्लायन्स रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.

रिपोर्टनुसार, १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान, WhatsApp ने ८५८४००० खाती बॅन केली आहेत, त्यापैकी १६५८००० अकाऊंट्सना युजर्सचा कोणताही रिपोर्ट मिळण्यापूर्वीच बॅन करण्यात आले आहेत. भारतात ६०० मिलियनहून अधिक युजर्स असलेल्या WhatsApp कडे सप्टेंबरमध्ये ८१६१ तक्रारी आल्या, त्यापैकी ९७ वर कारवाई करण्यात आली. 

"आम्ही आमच्या कामात पारदर्शकता ठेवू आणि भविष्यातील रिपोर्टमध्ये आमच्या प्रयत्नांची माहिती देऊ" असं कंपनीने म्हटलं आहे. या प्रयत्नांवर देखरेख ठेवण्यासाठी इंजिनिअर्स, डेटा सायंटिस्ट, एनालिस्ट, रिसर्चर्स आणि लॉ, ऑनलाईन सेफ्टी आणि टेक्नॉलॉडी डेव्हलपमेंट एक्स्पर्टची एक टीम नियुक्त केली आहे.

व्हॉट्सॲपने म्हटले आहे, "आम्ही युजर्सना ॲपमध्येच कोणत्याही कॉन्टॅक्ट्सना ब्लॉक करण्याची आणि रिपोर्ट करण्याची सुविधा देतो. आम्ही युजर्सचा फीडबॅककडे बारकाईने लक्ष देतो आणि चुकीची माहिती रोखण्यासाठी, सायबर सुरक्षेला चालना देण्यासाठी आणि निवडणुकीची अखंडता राखण्यासाठी कटिबद्ध आहोत."

१ ऑगस्ट २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत कंपनीने ८४५८००० WhatsApp खाती बंद केली होती. यापैकी १६६१००० खाती युजर्सकडून तक्रारी येण्यापूर्वीच बॅन करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यातही देशभरातून १० हजार ७०७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ९३ तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे.
 

Web Title: WhatsApp banned more than 85 lakh accounts in india in september say report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.