व्हॉट्सअॅपची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; 'या' कारणामुळे 30 लाख भारतीय अकॉउंटसवर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 12:34 PM2021-09-02T12:34:43+5:302021-09-02T12:34:50+5:30
WhatsApp banned Indian accounts: सोशल मीडिया कंपन्यांना प्रत्येक महिन्याला कम्प्लयांस रिपोर्ट प्रसिद्ध करावा लागतो, त्यानुसार व्हॉट्सअॅपने आपला रिपोर्ट प्रकाशित केला आहे.
WhatsApp ने जून ते जुलैच्या कालावधीत 30 लाखांपेक्षा जास्त भारतीय युजर्सचे अकॉउंट बॅन केले आहेत. ही माहिती कंपनीच्या कम्प्लयांस रिपोर्टमधून समोर आली आहे. ही बंदी अपायकारक वागणुकीमुळे आणल्याची माहिती व्हॉट्सअॅप मेसेंजरने दिली आहे. व्हॉट्सअॅपवर नवीन माहिती आणि तंत्रज्ञान नियमावली लागू झाली आहे त्यामुळे सोशल मीडिया कंपन्यांना प्रत्येक महिन्याला कम्प्लयांस रिपोर्ट प्रसिद्ध करावा लागतो, त्यानुसार व्हॉट्सअॅपने आपला रिपोर्ट प्रकाशित केला आहे.
व्हॉट्सअॅपने आपल्या नियमावली अंतगर्त एकूण 30,27,000 अकॉउंट्स दीड महिन्यात बॅन केले आहेत. 16 जून पासून 31 जुलै दरम्यान ही कारवाई करण्यात आली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात आले आहे. याआधी 15 मे ते 15 जून दरम्यान 20 लाख भारतीय अकॉउंट बॅन करण्यात आले होते.
अशाप्रकारे करा व्हॉट्सअॅप संबंधित तक्रार
व्हॉट्सअॅपने Paresh B Lal यांची भारतातील Grievance officer म्हणून नेमणूक केली आहे. जून व जुलै दरम्यान 594 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. जर तुम्हाला व्हॉट्सअॅपवरील एखाद्या मेसेज, मीडिया फाईल किंवा व्यक्तीमुळे त्रास हो असेल तर तुम्ही WhatsApp Grievance officer ला कळवू शकता. यासाठी तुम्ही grievance_officer_wa@support.whatsapp.com वर Email करू शकता किंवा 1800-212-8552 या अधिकृत फोन नंबरवर कॉल करू शकता. तसेच Post Box No. 56. Road No. 1, Banjara Hills. Hyderabad – 500 034. Telangana, India या पत्त्यावर तुम्ही पत्र देखील पाठवू शकता.