...म्हणून WhatsApp करतंय युजर्सना बॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 09:47 AM2019-11-12T09:47:24+5:302019-11-12T09:51:49+5:30
व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हेरगिरी केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली - व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हेरगिरी केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. यानंतर आता लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप गेल्या आठवड्यापासून संशयास्पद नावं असणाऱ्या ग्रुप्सना कायमचं बॅन करत आहे. संशयास्पद नाव किंवा एखादा हेतू बाळगून तयार केलेल्या ग्रुपवर व्हॉट्सअॅप कारवाई करत आहे. व्हॉट्सअॅप हॅकिंगमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका युजरने कॉलेजच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचं नाव बदलून एका आक्षेपार्ह शब्दावरून दुसरं नाव ठेवलं होतं. त्यानंतर काही वेळातच व्हॉट्सअॅपकडून हा ग्रुप बॅन करण्यात आला. तसेच व्हॉट्सअॅपने फक्त ग्रुप नाही तर ग्रुपमधील सर्व मेंबरना बॅन केले आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता 100 ग्रुप मेंबर्सना बॅन केल्याची माहिती आणखी एका युजरने दिली आहे.
व्हॉट्सअॅपने बॅन केल्याचे समजताच युजर्सनी कंपनीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कंपनीने तुम्ही व्हॉट्सअॅपचे नियम आणि अटींचं उल्लंघन केल्यामुळे तुम्हाला बॅन केल्याचा ऑटोमॅटीक रिप्लाय देण्यात आला आहे. बॅन केल्यानंतर कोणतीही मदत केली जात नाही. त्यामुळे व्हॉट्सअॅपचा वापर करताना आता युजर्सना थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासोबतच संशयास्पद ग्रुपचा भाग न होणं योग्य आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. यावेळीही व्हॉट्सअॅपने असंच एक फायदेशीर फीचर आणलं आहे. या फीचरचा सर्वाधिक फायदा हा Netflix युजर्सना होणार आहे. याआधी काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपमध्ये एक फीचर आलं होतं. यामध्ये YouTube चे व्हिडीओ हे व्हॉट्सअॅप चॅटमध्ये दिसत होते. Picture in Picture मोडच्या माध्यमातून YouTube व्हिडीओ हा एका फ्लोटिंग विंडोमध्ये व्हॉट्सअॅप चॅटमध्ये प्ले होतो. अशाच पद्धतीने Netflix वरचे व्हिडीओ पाहता येणार आहेत.
WABetainfo च्या एका रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅपमध्ये Netflix ला देखील सपोर्ट देण्यात येणार आहे. Netflix चे ट्रेलरचे व्हिडीओ आता थेट व्हॉट्सअॅपमध्ये प्ले होणार आहेत . जर कोणी तुम्हाला व्हॉट्सअॅपवर Netflix चा कंटेंट अथवा फिल्म किंवा सीरीजचा ट्रेलर पाठवला तर ते युजर्सला व्हॉट्सअॅप चॅटमध्येच पाहता येणार आहे. सध्या एखाद्या व्यक्तीने Netflix ची लिंक शेअर केली तर ती ओपन करण्यासाठी Netflix अॅप ओपन होतं. त्यानंतर ट्रेलर पाहायला मिळतो.