या कारणांमुळे 22 लाखांपेक्षा जास्त भारतीयांना गमवावे लागले WhatsApp अकॉउंट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 03:59 PM2021-11-02T15:59:24+5:302021-11-02T15:59:33+5:30
Whatsapp Bans Indian Accounts: सप्टेंबरमध्ये व्हॉट्सअॅपने 22 लाखांपेक्षा जास्त भारतीय व्हॉट्सअॅप अकॉउंट्सवर बंदी घातली आहे.
व्हॉट्सअॅप आपल्या नियमांच्या बाबतीत दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे दिसत आहे. कंपनीने ऑगस्टमध्ये 20 लाखांपेक्षा जास्त भारतीय अकॉउंट बॅन केले होते. त्यानंतर आता सप्टेंबरमध्ये देखील कंपनीने आपली कारवाई सुरुच ठेवली आहे. आता सप्टेंबरमध्ये व्हॉट्सअॅपने 22 लाखांपेक्षा जास्त भारतीय व्हॉट्सअॅप अकॉउंट्सवर बंदी घातली आहे. अशी माहिती कंपनीच्या मासिक अहवालातून समोर आली आहे.
अकॉउंट बॅन मागील कारण
इन्स्टंट मेसेजिंग अॅपच्या नियमांचा भंग केल्यामुळे व्हॉट्सअॅप अकॉउंट्स बॅन करण्यात आले आहेत. WhatsApp युजर्सच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. व्हॉट्सअॅपच्या युजर सेफ्टी रिपोर्टनुसार एकूण 22,09,000 अकॉउंट बंद करण्यात आले आहेत. जर तुम्ही देखील कंपनीच्या नियमांचे पालन केले नाही, तर तुमचं अकॉउंट देखील या यादीत सामील होऊ शकतं.
व्हॉट्सअॅपने याआधी सांगितले होते कि बॅन झालेल्या एकूण अकॉउंटस पैकी 95 टक्क्यांहून अधिक अकॉउंटस मर्यादेपेक्षा जास्त मसेजेस पाठवल्यामुळे बॅन केले जातात. बॅन केलेल्या युजर्सपैकी जास्तीत जास्त लोक ऑटोमेटड मेसेज, बल्क मेसेजिंग किंवा स्पॅम मेसेजचा अनधिकृतपणे वापर करत असतात.तसेच बेकायदेशीर, अश्लील, धमकावणारे, भीतीदायक, त्रासदायक आणि द्वेषपूर्ण कंटेंट शेयर केल्यावर देखील कंपनी कारवाई करू शकते. जर तुम्हाला तुमचे अकॉउंट सुरक्षित ठेवायचे असेल तर या गोष्टी टाळा.