अरे बापरे! WhatsApp मध्ये आलाय मोठा बग; चॅट उघडताच ग्रीन होते स्क्रीन, 'असा' सोडवा प्रॉब्लेम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 10:56 AM2024-11-11T10:56:58+5:302024-11-11T10:57:27+5:30
WhatsApp : तुम्ही जर WhatsApp चं बीटा व्हर्जन वापरत असाल तर तुम्हाला सावधान राहण्याची आवश्यकता आहे. ॲपच्या बीटा 2.24.24.5 व्हर्जनमध्ये एक मोठा बग समोर आला आहे.
तुम्ही जर WhatsApp चं बीटा व्हर्जन वापरत असाल तर तुम्हाला सावधान राहण्याची आवश्यकता आहे. ॲपच्या बीटा 2.24.24.5 व्हर्जनमध्ये एक मोठा बग समोर आला आहे. या बगमुळे युजर्सच्या फोनची स्क्रीन पूर्णपणे ग्रीन म्हणजेच हिरव्या रंगाची होत आहे. ही समस्या विशेषतः हजारो Android युजर्सना येत आहे. iOS बीटा टेस्टर्सना सध्या अशा कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही.
युजर्स चॅट किंवा मेसेज उघडण्याचा प्रयत्न करताच, स्क्रीन अचानक ग्रीन होते. ॲप बंद होईपर्यंत संपूर्ण स्क्रीन ग्रीनच दिसते. हजारो युजर्सना या समस्येचा सामना करावा लागत आहे. या समस्येबद्दल, काही युजर्सनी ट्विटरवर देखील पोस्ट केली आहे. WhatsApp बीटा व्हर्जन योग्यरित्या काम करत नाही आणि WhatsApp वापरताना स्क्रीन पुन्हा पुन्हा ग्रीन होते. मात्र, या समस्येबाबत मेटाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
'असा' सोडवा प्रॉब्लेम
सध्या ही समस्या WhatsApp च्या स्टेबल व्हर्जनमध्ये नाही. ही समस्या सोडवायची असेल तर काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
- WhatsApp बीटा व्हर्जनवरून स्टेबल व्हर्जनवर स्विच करा. यामुळे तुमचं WhatsApp पूर्णपणे सुरक्षित होईल.
- शक्य असल्यास, WhatsApp वेब किंवा लॅपटॉप, टॅबलेट किंवा आयफोनसारख्या इतर सर्व उपकरणांवर वापर करा. याच्या मदतीने तुम्ही बग टाळू शकता
- WhatsApp अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करा. परंतु हे करण्याआधी Google Cloud वर तुमच्या मेसेजचा बॅकअप घ्यायला विसरू नका, जेणेकरून तुमचे चॅट्स सुरक्षित राहतील.
- मेटा समस्येचे निराकरण करेपर्यंत तुम्ही वाट पाहू शकता.