WhatsApp ने आणलं कस्टम चॅट लिस्ट फीचर; युजर्सचा होणार मोठा फायदा, कसा करायचा वापर?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 03:15 PM2024-11-01T15:15:53+5:302024-11-01T15:27:40+5:30

WhatsApp हा एक इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे, लाखो लोक त्याचा वापर करतात.

whatsapp bring custom chat list feature know about it and how helps | WhatsApp ने आणलं कस्टम चॅट लिस्ट फीचर; युजर्सचा होणार मोठा फायदा, कसा करायचा वापर?

WhatsApp ने आणलं कस्टम चॅट लिस्ट फीचर; युजर्सचा होणार मोठा फायदा, कसा करायचा वापर?

WhatsApp हा एक इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे, लाखो लोक त्याचा वापर करतात. आपल्या मित्रांशी कनेक्ट राहण्यासाठी त्याचा फायदा होतो. कंपनी आपल्या युजर्सना अनेक फीचर्स देखील ऑफर करते, जे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहेत. आता WhatsApp ने एक नवीन फीचर आणलं आहे जे युजर्सना त्यांची चॅट लिस्ट मॅनेज करण्यात मदत करेल. कस्टम लिस्ट्स असं या फीचरचं नाव आहे. 

युजर्स या फीचरच्या माध्यमातून त्यांचे चॅटचे त्यांच्या आवडीच्या ग्रुपमध्ये कॅटेगराईझ करू शकतात, ज्यामुळे त्यांना चॅट सहजपणे शोधण्यात आणि त्यांच्या आवडीनुसार सेट करण्यात मदत होईल. व्हॉट्सॲपने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे की, लिस्ट्ससह, तुम्ही आता तुमच्या आवडीच्या कस्टम कॅटेगरीजसह आपलं चॅट फिल्टर करू शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा तुमचे शेजारी आणि इतर लिस्ट्स तयार करू शकता 

लिस्ट तुम्हाला त्या चॅटवर फोकस करण्यात मदत करतात, जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा जे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असतात. कस्टम लिस्टसह युजर्स त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी, ऑफिसमधील सहकारी, शेजारी किंवा इतर कोणत्याही कॅटेगरीसह ग्रुप तयार करू शकतात. हे युजर्सना संपूर्ण चॅट लिस्टमध्ये स्क्रोल न करता विशिष्ट चॅटवर लक्ष केंद्रित करण्यास परवानगी देतं.

कस्टम लिस्ट तयार करणं ही एक सोपी प्रोसेस आहे. युजर्सना चॅट टॅबच्या टॉपवर असलेल्या फिल्टर बारमधील "+" चिन्हावर टॅप करायचं आहे आणि त्यांच्या नवीन लिस्टसाठी नाव देणं आवश्यक आहे. त्यानंतर युजर्स त्यांच्या आवडत्या यादीमध्ये कोणतेही चॅट जोडू शकतात. युजर्स ही लिस्ट एडिट देखील करू शकतात. लिस्ट एडिट करणं खूप सोपं आहे. एकदा लिस्ट तयार झाल्यानंतर, ती फिल्टर बारमध्ये दिसते, ज्यामुळे विविध चॅट ग्रुपमध्ये ती सहज स्विच करण्याची सुविधा मिळते.
 

Web Title: whatsapp bring custom chat list feature know about it and how helps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.