लवकरच WhatsApp वर नवीन फीचर्स, हाय-क्वॉलिटीचे फोटो पाठवता येणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 03:35 PM2023-01-25T15:35:50+5:302023-01-25T15:36:07+5:30

WhatsApp : ज्या फीचर्सबद्दल बोलत आहोत, ते तुम्हाला उत्तम क्वालिटीचे फोटो शेअर करण्यात मदत करेल.

whatsapp bringing new feature for sending best photo quality | लवकरच WhatsApp वर नवीन फीचर्स, हाय-क्वॉलिटीचे फोटो पाठवता येणार!

लवकरच WhatsApp वर नवीन फीचर्स, हाय-क्वॉलिटीचे फोटो पाठवता येणार!

Next

नवी दिल्ली : व्हॉट्सअॅप (WhatsApp) वापरणाऱ्या बहुतेक लोकांना हे माहित आहे की, जेव्हा आपण आपल्या मित्रांसोबत फोटो शेअर करतो तेव्हा काही वेळा फोटोंची क्वॉलिटी खूप खराब होते, परिणामी तुम्हाला हे फोटो सोशल मीडियासह इतर अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करताना खूप समस्या निर्माण होतात. कारण फोटोंची क्वॉलिटी तुमच्या इच्छेनुसार राहत नाही. जर तुम्ही या समस्येवर उपाय शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला WhatsApp च्या नवीन फीचरबद्दल सांगणार आहोत, जे लवकरच लाँच होणार आहे.

ज्या फीचर्सबद्दल बोलत आहोत, ते तुम्हाला उत्तम क्वालिटीचे फोटो शेअर करण्यात मदत करेल. दरम्यान, हे सध्या टेस्टिंगच्या स्टेजमध्ये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवण्यापूर्वी क्वालिटी सिलेक्शनचा ऑप्शन यूजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, अॅपच्या आगामी फीचर्समध्ये यूजर्सना हाय-रिझोल्युशनमध्ये फोटो पाठवण्याचा ऑप्शन मिळेल.

युजर्सना नवीन बीटा व्हर्जन अॅपमध्ये टॉपला एक सेटिंग बटण मिळेल, जेणेकरुन युजर्स फोटो क्वॉलिटी निवडू शकतील आणि ओरिजनल क्वॉलिटीमध्ये फोटो पाठवू शकतील. हे नवीन फीचर्स सर्व युजर्ससाठी काही कालवधीत उपलब्ध होईल आणि त्यांना यापुढे फोटो पाठवताना आणि प्राप्त करताना क्वॉलिटीची चिंता करावी लागणार नाही.

हे फीचर आल्यानंतर युजर्सना फोटो पाठवताना कोणतीही अडचण येणार नाही, जी याआधी येत होती. या फीचरची वाट पाहणे वर्षानुवर्षे सुरू होते, मात्र आता लोकांना फोटो पाठवणे सोपे होईल, असा विश्वास आहे. टेस्टिंग स्टेजमध्ये असल्याने, आता असे गृहीत धरले जात आहे की, काही आठवड्यांत हे फीचर तुमच्या फोनवर  व्हॉट्सअॅप वापर करताना दिसू लागेल.
 

Web Title: whatsapp bringing new feature for sending best photo quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.