अरे व्वा! WhatsApp चॅटिंगची गंमत आता आणखी वाढणार, लवकरच "हे" भन्नाट फीचर येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 09:29 PM2021-01-25T21:29:36+5:302021-01-25T21:38:24+5:30

WhatsApp News : व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं.

whatsapp brings new feature will soon get sticker shortcut feature | अरे व्वा! WhatsApp चॅटिंगची गंमत आता आणखी वाढणार, लवकरच "हे" भन्नाट फीचर येणार

अरे व्वा! WhatsApp चॅटिंगची गंमत आता आणखी वाढणार, लवकरच "हे" भन्नाट फीचर येणार

Next

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप सध्या आपल्या नव्या पॉलिसीमुळे चर्चेत आहे. अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅपसारख्या इतर मेसेजिंग अ‍ॅपचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. मात्र याच दरम्यान व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी एक नवीन भन्नाट फीचर आणणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. यावेळीही असंच एक जबरदस्त फीचर लवकरच येणार असून यामुळे चॅटिंगची गंमत आणखी वाढणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर स्टीकर शॉर्टकट (Sticker Shortcut) नावाचं एक फीचर येणार आहे.

WABetaInfo ने WhatsApp मधील स्टीकर शॉर्टकट फीचरची माहिती दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये हे फीचर लवकरच ग्लोबल युजर्ससाठी रोलआऊट केलं जाऊ शकतं. चॅट बारमध्ये हे फीचर पाहायला मिळू शकतं. रोलआऊट झाल्यानंतर युजर्सला चॅट बारमध्ये इमोजी एंटर करण्यासाठी किंवा कोणताही शब्द लिहिल्यावर वेगळ्या रंगात वेगवेगळे आयकॉन दिसतील. तर कीबोर्डला एक्सपान्ड करण्यावर व्हॉट्सअ‍ॅपचे सर्व स्टीकर पाहता येतील. स्टीकर शॉर्टकट शिवाय कंपनीने अँड्रॉईड आणि आयओएस बेस्ड अ‍ॅप्ससाठी नवीन अ‍ॅनिमेटेड स्टीकर पॅकला रिलीज केले आहे. हे फीचर व्हॉट्सअ‍ॅप वेबसाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. 

स्टीकर शॉर्टकट फीचरसोबतच व्हॉट्सअ‍ॅपने अ‍ॅनिमेटेड स्टीकर पॅकची सुविधा देखील दिली आहे. ज्यामध्ये युजर्सना sumikkogurashi, lovely sugar cubs, tonton friends, cutie pets आणि baby shark सारखे स्टीकर्स मिळणार आहेत. स्टीकर्स स्टोरवरून ते डाऊनलोड करता येतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या सुरक्षितेतवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्हॉट्सअ‍ॅप वेबचा वापर हा बऱ्याचदा केला जातो. मात्र आता ते देखील सेफ राहिलेलं नाही अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअ‍ॅप वेबचा वापर करणाऱ्या युजर्सचा फोन नंबर गुगल सर्चवर लीक झाल्याचा खळबळजनक प्रकार आता समोर आला आहे. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप  युजर्सची चिंता आणखी वाढली आहे. 

WhatsApp Web च्या सुरक्षिततेलाही धोका; युजर्सचे फोन नंबर Google Search वर लीक, रिपोर्टमधून दावा

एका रिपोर्टमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वेब युजर्सचे फोन नंबर गुगल सर्चने इंडेक्स केल्याचं म्हटलं आहे. याच्या माध्यमातून एखादी व्यक्ती गुगलवर योग्य पद्धतीन सर्च करून युजर्सचा मोबाईल नंबर शोधू शकते. इंटरनेट सिक्योरिटी रिसर्चर राजशेखर राजहरिया यांनी असा दावा केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याचे काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. यात गुगल सर्चमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वेब वापरणाऱ्या युजर्सचे कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहेत. कॉन्टॅक्ट नंबरसह मेसेजही गुगल सर्चमध्ये उपलब्ध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राजशेखर राजहरिया यांनी युजर्सचे कॉन्टॅक्ट डिटेल्स व्हॉट्सअ‍ॅप वेबद्वारे गुगलवर लीक होत आहेत. ज्यावेळी युजर्स लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर व्हॉट्सऍपचा QR कोडद्वारे वापर करतात, त्यावेळी गुगल याचं इंडेक्सिंग करतो. 

काय सांगता? WhatsApp अकाऊंट डिलीट केल्यानंतरही 90 दिवसांपर्यंत धोका; कधीही लीक होऊ शकतं चॅट

व्हॉट्सअ‍ॅपसंबंधित रोज नवनवीन माहिती ही समोर येत असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोक मोठ्या प्रमाणात या नव्या पॉलिसीचा विरोध करताना पाहायला मिळत आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीबाबत युजर्समध्ये नाराजी असतानाच आता अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपचं अकाऊंट डिलीट केल्यानंतरही 90 दिवसांपर्यंत धोका असून चॅट लीक होऊ शकत असल्याची माहिती मिळत आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे युजर्स आपला डेटा प्रायव्हेट ठेऊ इच्छित असल्यास, त्यांना अ‍ॅप अनइन्स्टॉल नाही, तर डिलीट करावं लागेल. जर अकाऊंट डिलीट केलं नाही, तर डेटा व्हॉट्सअ‍ॅपकडे राहील. तसेच अकाऊंट डिलीट केल्यानंतरही 90 दिवसांपर्यंत युजर्सचा डेटा व्हॉट्सअ‍ॅपकडे राहतो.

Web Title: whatsapp brings new feature will soon get sticker shortcut feature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.