WhatsApp वर करू नका या 8 चुका; कायमच बॅन होऊ शकतं तुमचं अकॉउंट
By सिद्धेश जाधव | Published: December 9, 2021 05:43 PM2021-12-09T17:43:11+5:302021-12-09T17:43:37+5:30
Whatsapp नं आपल्या अधिकृत वेबसाईटवरून Terms of Service ची माहिती दिली आहे. या नियमांचं उल्लंघन केल्यास कंपनी तुमचं अकॉउंटवर बॅन करू शकते.
Whatsapp भारतातील लोकप्रिय इन्स्टंट मेसेंजर आहे. त्यामुळे स्मार्टफोन हातात आल्यानंतर त्यात इन्स्टॉल होणाऱ्या अॅप्समध्ये सर्वात व्हॉट्सअॅपचा समावेश असतोच. या प्रसिद्धीचा गैरफायदा देखील घेतला जातो. अनेक सायबर क्राईम व्हॉट्सअॅपमुळे यशस्वी होतात. अशा अकॉउंटस अनेक अकॉउंटसवर कंपनीकडून कारवाई केली जाते. तसेच अजून काही नियमांचे उल्लंघन केल्यास अकॉउंट बॅन केले जातात.
ऑक्टोबर 2021 मध्ये भारतात 20 लाखांपेक्षा जास्त अकॉउंट बॅन केले आहेत. त्याआधी 30.27 लाख भारतीय अकॉउंट प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आले होते. याची माहिती Whatsapp च्या मासिक रिपोर्टमधून समोर येते. बॅन केलेल्या अकॉउंटसमध्ये चुकीची माहिती आणि खोट्या बातम्या पसरवणे इत्यादी चुका करणारे युजर्स असतात.
WhatsApp वर मेसेज एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड असतात, म्हणजे सेंडर आणि रिसिव्हर व्यतिरिक्त इतर कोणी ते वाचू शकत नाही. परंतु युजर्सनी शेयर केलेल्या लिंक्स आणि मीडियाचा मेटा डेटा कंपनी ट्रॅक करते. यातून कोणी Whatsapp च्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या Terms of Service चे उल्लंघन करत असेल, तर ते अकॉउंट बॅन केले जाते. वेबसाईटनुसार या 8 चुकांमुळे तुमचं अकॉउंट बॅन केले जाऊ शकते. तसेच काही गुन्ह्यांमध्ये व्हॉट्सअॅप पोलिसांना कायदेशीर कारवाईसाठी युजरचा मेटा डेटा देखील देऊ शकतं.
या 8 चुका करू नका…
- जर तुम्ही कोणाचं फेक अकॉउंट बनवलं तर Whatsapp तुमचं अकॉउंट बॅन करेल.
- कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या व्यक्तीला खूप जास्त मेसेज पाठवले, तर Whatsapp अकॉउंट गमवावं लागू शकतं.
- WhatsApp Delta, GBWhatsApp, WhatsApp Plus इत्यादी थर्ड पार्टी अॅपचा वापर करणाऱ्यांवर बॅनची कारवाई केली जाऊ शकते.
- जर तुम्हाला जास्त युजर्सनी ब्लॉक केलं तरी देखील तुमचं Whatsapp अकॉउंट बॅन होऊ शकतं.
- तुमच्या WhatsApp अकॉउंट विरोधात अनेक लोकांनी रिपोर्ट फाईल केला तर कंपनीला बॅनची कारवाई करावी लागते.
- मालवेयर किंवा फिशिंग लिंक पाठवणारे युजर देखील प्लॅटफॉर्मवर ठेवले जात नाहीत.
- Whatsapp वर अश्लील क्लिप, धमकी किंवा अपमानकारक मेसेज पाठवणारे देखील बॅन होतात.
- Whatsapp वर हिंसेला प्रोत्साहन देणारे खोटे मेसेज किंवा व्हिडीओ पाठवणारे अकॉउंट देखील बॅन केले जातात.