व्हॉट्सअॅपही हॅक होऊ शकते...कसे वाचाल यापासून?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 03:28 PM2018-09-24T15:28:14+5:302018-09-24T15:29:15+5:30
इन्स्टंट मॅसेजिंग अॅप म्हणून कमी काळात मोठी प्रसिद्धी मिळविणाऱ्या व्हॉट्सअॅपचे एकट्या भारतातच 20 कोटींपेक्षा जास्त वापरकर्ते आहेत.
इन्स्टंट मॅसेजिंग अॅप म्हणून कमी काळात मोठी प्रसिद्धी मिळविणाऱ्या व्हॉट्सअॅपचे एकट्या भारतातच 20 कोटींपेक्षा जास्त वापरकर्ते आहेत. यामुळे या वापरकर्त्यांची सुरक्षा हा मोठा मुद्दा बनला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार एंड-टू-एंड इनक्रिप्शन सिक्युरिटी वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित ठेवते. मात्र, व्हॉट्सअॅपही हॅक केले जाऊ शकते. हॅकर्सपासून तुमचे व्हॉट्सअॅप कसे सुरक्षित ठेवावे ते पाहा.
व्हॉट्सअॅप वेबचा घ्या आधार
व्हॉट्सअॅपच्या वेब पर्यायावर गेल्यास तेथे लॉग आऊटचा पर्याय दिसेल. त्यावर जाऊन लॉग आऊट बचनावर क्लिक करावे. यानंतर जेवढ्या ठिकाणी तुमचे व्हॉट्सअॅप खाते सुरु असेल तेथून डिसकनेक्ट होईल.
व्हॉट्सअॅप सपोर्ट
जर व्हॉट्सअॅपचा अॅक्सेस मिळत नसेल तर support@whatsapp.com वर मेल करून व्हॉट्सअॅपचे अकाऊंट डिअॅक्टीवेट करता येते. यानंतर पुढील 30 दिवस तुम्ही या अकाऊंटचा अॅक्सेस केला नसेल तर ते डिलीट होईल.
व्हॉट्सअॅप हॅक होण्यापासून कसे वाचाल?
व्हॉट्सअॅप हॅक होण्यापासून वाचायचे असेल, तर व्हॉट्सअॅप पासवर्ड, पिन किंवा पॅटर्नद्वारे सुरक्षित करावे. तसेच अनोळखी ठिकाणच्या वायफायचा वापर करणेही धोक्याचे आहे. हॅकर्स याद्वारे स्मार्टफोन हॅक करू शकतात. या शिवाय वेगळ्या MAC अॅड्रेसद्वारे व्हॉट्सअॅप संदेश पाहू शकतात.
2 स्टेप व्हेरिफिकेशन फायद्याचे
व्हॉट्सअॅपचे हे फिचर आपल्याला जास्त सुरक्षा पुरविली जाते. या द्वारे व्हॉट्सअॅप खाते हॅक होण्यापासून वाचता येते. याद्वारे सेट केलेला पासवर्ड अधून मधून विचारला जातो. तसेच दुसऱ्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप खाते सुरु केल्यासही आधी पासवर्ड टाकावा लागतो.