Whatsapp Number Ban: व्हॉट्सॲपने बंद केली ९३ लाख अकाऊंट्स! तुमचेही होऊ शकते...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 07:13 AM2021-11-04T07:13:06+5:302021-11-04T07:13:20+5:30

वादग्रस्त मजकुरामुळे कारवाई. देशभरात २६ मेपासून नवीन आयटी नियम लागू झाले. या नव्या नियमांनुसार समाजमाध्यम मंचांना दर महिन्याला अनुपालन अहवाल सादर करावा लागतो.

WhatsApp closes 93 lakh accounts! pdc | Whatsapp Number Ban: व्हॉट्सॲपने बंद केली ९३ लाख अकाऊंट्स! तुमचेही होऊ शकते...

Whatsapp Number Ban: व्हॉट्सॲपने बंद केली ९३ लाख अकाऊंट्स! तुमचेही होऊ शकते...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशभरातील कोट्यवधी वापरकर्त्यांच्या प्रथम पसंतीच्या असलेल्या व्हॉट्सॲप या समाजमाध्यम मंचाने गेल्या चार महिन्यांत तब्बल ९३ लाख खाती बंद केली आहेत. नवीन आयटी नियमांच्या आधारे ही खाती बंद करण्यात आली असून, बहुतांश खात्यांवर वादग्रस्त मजकूर असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. 

देशभरात २६ मेपासून नवीन आयटी नियम लागू झाले. या नव्या नियमांनुसार समाजमाध्यम मंचांना दर महिन्याला अनुपालन अहवाल सादर करावा लागतो. त्यानुसार व्हॉट्सॲपने अलीकडेच यासंदर्भातील अहवाल जारी केला आहे. अहवालातील नोंदीनुसार वापरकर्त्यांनी केलेल्या तक्रारींवरून एकट्या सप्टेंबर महिन्यात २२ लाख ९ हजार खाती बंद करण्यात आली. जुलैपासून सादर होणाऱ्या मासिक अहवालांनुसार व्हॉट्सॲपने आतापर्यंत ९३ लाख खात्यांवर बंदीची कारवाई केली असल्याचे निदर्शनास आले आहे. 

तक्रारी काय?
वादग्रस्त मजकूर लिहिणे, आक्षेपार्ह मजकूर अग्रेषित करणे

वापरकर्त्यांसाठी रिपोर्टची सुविधा
वापरकर्त्यांचे कोणत्याही खात्याबाबत मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हॉट्सॲपने रिपोर्ट हे फीचर कार्यान्वित केले. 
नव्या आयटी नियमांचे कशा रीतीने पालन केले याबद्दलचा अहवाल समाजमाध्यम कंपन्यांनी दर महिन्याला प्रसिद्ध करावा, असे बंधन केंद्र सरकारने घातले आहे.

Web Title: WhatsApp closes 93 lakh accounts! pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.