मस्तच! WhatsApp वर फोटो पाठवण्यापूर्वी करता येणार ब्लर; आलं नवं फीचर, युजर्सचं काम होणार सोपं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 05:02 PM2022-10-28T17:02:47+5:302022-10-28T17:03:39+5:30
WhatsApp : नवीन फीचरचा एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे ज्यामध्ये ब्लर टूल कसं कार्य करेल ते दाखवलं आहे.
WhatsApp वर आता फोटो पाठवण्यापूर्वी इमेज ब्लर करता येणार आहे. WhatsApp ने आपल्या डेस्कटॉप बीटा युजर्ससाठी नवीन इमेज ब्लरिंग टूल आणलं आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, या नवीन टूलने युजर्स संवेदनशील चॅट किंवा माहिती ब्लर करू शकतील. या टूलला ब्लर टूल असं नाव देण्यात आलं आहे. हे टूल WhatsApp डेस्कटॉप बीटा 2.2241.2 साठी सादर करण्यात आलं आहे.
हे फीचर नुकतेच काही बीटा टेस्टर्ससाठी सुरू करण्यात आले आहे. जर तुम्हाला हे फीचर दिसत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. जूनमध्ये, कंपनीने सांगितलं होतं की, डेस्कटॉप बीटासाठी ब्लर फीचरवर काम सुरू आहे. आता ते टेस्टर्सना मिळत आहे.
WB ने या नवीन फीचरचा एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे ज्यामध्ये ब्लर टूल कसं कार्य करेल ते दाखवलं आहे. या टूल अंतर्गत, युजर्स कोणता भाग नेमका ब्लर करायचा आहे हे सिलेक्ट करू शकतात. जो भाग ब्लर करायचा आहे तो भाग सिलेक्ट करू शकता.
जर तुम्हाला हे फीचर मिळाले असेल तर तुम्ही फोटो पाठवून प्रयत्न करू शकता. फोटो पाठवण्यापूर्वी तुम्हाला ब्लर बटण दिसल्यास तुम्ही ते वापरून पाहू शकता. जर तुम्हाला हे फीचर मिळाले नसेल तर तुम्ही थोडी वाट पाहा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"