चॅटिंगची गंमत आणखी वाढणार, Instagram चं 'हे' फीचर Whatsapp मध्ये येणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 02:10 PM2019-08-10T14:10:46+5:302019-08-10T14:16:30+5:30

Instagram आणि Whatsapp आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स हे सातत्याने आणत असतात.

whatsapp could soon bring instagram like boomerang feature for iphone users news | चॅटिंगची गंमत आणखी वाढणार, Instagram चं 'हे' फीचर Whatsapp मध्ये येणार 

चॅटिंगची गंमत आणखी वाढणार, Instagram चं 'हे' फीचर Whatsapp मध्ये येणार 

Next
ठळक मुद्देInstagram आणि Whatsapp आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स हे सातत्याने आणत असतात. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये Boomerang हे फीचर येणार आहे. व्हिडिओ आणि फोटोंप्रमाणे बुमरँग व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्येही ठेवता येणार आहे.

नवी दिल्ली - व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. Instagram आणि Whatsapp आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स हे सातत्याने आणत असतात. मात्र आता युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण त्यांच्या चॅटिंगची गंमत आणखी वाढणार आहे. इन्स्टाग्रामवरचं एक दमदार फीचर लवकरच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये Boomerang हे फीचर येणार असून याच्या मदतीने इन्स्टाग्रामप्रमाणे बुमरँग व्हिडिओ युजर्सना तयार करता येणार आहेत.

तरुणाईमध्ये इन्स्टाग्राममधील बुमरँग हे फीचर अत्यंत लोकप्रिय आहे. व्हॉट्सअ‍ॅपचं हे नवं फिचर सर्वप्रथम आयओएस युजर्ससाठी जारी करण्यात येणार आहे. त्यानंतर अँड्रोइड युजर्ससाठी हे फीचर अपडेट केलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये हे फीचर कधी येणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. बुमरँग  फीचरच्या मदतीने आता व्हॉट्सअ‍ॅप युजर्स बुमरँग व्हिडिओ तयार करून मित्र, नातेवाईंकासोबत तो शेअर करु शकतात. 

व्हिडिओ आणि फोटोंप्रमाणे बुमरँग व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्येही ठेवता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना हे नवं फीचर व्हिडीओ टाईप पॅनलमध्ये मिळणार असून ते व्हिडीओ फाईल  GIF मध्ये बदलण्यासाठी मदत करतं. या फीचरमुळे युजर्स 7 सेकंदाच्या व्हिडिओचं जीआयएफमध्ये रुपांतर करु शकतात. तसेच 7 सेकंदाचा व्हिडिओ बुमरँग करता येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

millions of instagram influencers personal data leaked traced to india report | बापरे! Instagram च्या 4.9 कोटी हाय-प्रोफाईल युजर्सचा डेटा लीक

वादग्रस्त पोस्टवर अनेक अ‍ॅप कठोर कारवाई करत आहेत. अशाच काही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्यांवर आता इन्स्टाग्राम हे अ‍ॅप नजर ठेवणार आहे. सोशल मीडियात फोटोंच्या दुनियेतून वर्चस्व गाजवणाऱ्या इन्स्टाग्रामचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. 

आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युजर्सवर इन्स्टाग्राम आता नजर ठेवण्याची तयारी करत आहे. लवकरच इन्स्टाग्रामवर पॉप अप वॉर्निंगसारखं फीचर येणार आहे. इन्स्टाग्रामचे प्रमुख एडम मोसेरी यांनी  एक पत्रकार परिषद घेतली. 'इन्स्टाग्रामवर सुरक्षित वातावरण तयार करणं ही आमची जबाबदारी आहे. आम्ही एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस टूल तयार केलं असून ते टूल आक्षेपार्ह मजकुरावर बारकाईने नजर ठेवणार आहोत.' अशी माहिती एडम मोसेरी यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. 

Instagram स्टोरीसाठी गाणं वाजणार, नवे 'लिरिकल स्टीकर्स' येणार

सोशल मीडियात फोटोंच्या दुनियेतून वर्चस्व गाजवणाऱ्या इन्स्टाग्रामचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. इन्स्टामध्ये असलेलं स्टोरी फीचर अत्यंत लोकप्रिय आहे. यामध्ये सध्या एका नव्या फीचरची चाचणी करण्यात येत आहे. इन्स्टाच्या स्टोरीमध्ये स्टीकर्स अ‍ॅड केल्यानंतर बॅकग्राऊंडला गाणं ऐकू येणार आहे. अ‍ॅपमध्ये लवकरच हे नवं फीचर येण्याची शक्यता आहे. 

how to stop whatsapp from auto downloading media files directly to the phones gallery | Whatsapp मुळे फोन मेमरी Full झालीय? मग

WhatsApp मेसेजचा कंटाळा आलाय? अकाऊंट डिलीट न करता व्हा 'Invisible'

Whatsapp वर असा बनवा 'सीक्रेट ग्रुप'

व्हॉट्सअ‍ॅपवर काही फोटो किंवा व्हिडीओ हे युजर्सना दुसऱ्यांना सेंड करायचे नसतात. तर स्वत: कडेच ठेवायचे असतात. यासाठी एक खास ट्रिक आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर एक सीक्रेट ग्रुप तयार करून पर्सनल फोटो, व्हिडीओ, महत्त्वाच्या लिंक आणि डॉक्यूमेंट सुरक्षित ठेवता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर आपला सीक्रेट ग्रुप तयार करण्यासाठी काही मिनिटांसाठी कोणत्यातरी एका मित्राला आपल्या या नव्या ग्रुममध्ये सामील करावं लागेल. तुम्हाला हव्या असलेल्या नावाने एक नवा ग्रुप तयार करा. काही मिनिटांसाठी त्यामध्ये आपल्या एका मित्राला अ‍ॅड करा. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या ग्रुप इंफोमध्ये जा. यासाठी ग्रुपच्या वर देण्यात आलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. त्यामध्ये गेल्यावर आपल्या मित्राला त्या ग्रुपमधून रिमूव्ह करा. त्यानंतर त्या ग्रुपमध्ये केवळ तुम्हीच राहाल. म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅपवरचा तुमचा सीक्रेट ग्रुप तयार झाला आहे. यामध्ये तुम्ही एकटेच असल्याने तुम्हाला हवे असलेले फोटो आणि इतर काही महत्त्वाच्या गोष्टी सुरक्षित आहेत. 

WhatsApp स्टेटसला फेसबुक स्टोरी बनवायचंय? मग 'या' स्टेप्स करतील मदत 

Whatsapp वरचं खास चॅट लपवायचंय? कसं ते जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपवरीस काही चॅट्स हे खास असतात. ते कोणी पाहू नये असं नेहमी युजर्सना वाटत असतं. आयफोन युजर्सना चॅट लपवण्याची सुविधा ही देण्यात आली आहे. मात्र आता अँन्ड्रॉईड युजर्सना देखील चॅट लपवता येणार आहे. यासाठी सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. चॅट स्क्रिनमध्ये तुम्हाला हवं असलेलं चॅट टॅप करा आणि प्रेस करा. आर्काइव्ह करायचं आहे त्या चॅटवर क्लिक करा. त्यानंतर आर्काइव्ह आयकॉन सिलेक्ट करा. चॅट आर्काइव्ह झाल्यानंतर नॉर्मल स्क्रिनवर ते दिसणार नाही. आर्काइव्ह चॅट्स हे चॅट स्क्रिनच्या खाली जाऊन अ‍ॅक्सेस करता येतं.

 

Web Title: whatsapp could soon bring instagram like boomerang feature for iphone users news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.