जबरदस्त! WhatsApp चं आणखी एक कमाल फीचर; Video कॉलसह म्युझिकही ऐकता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 02:14 PM2023-12-07T14:14:24+5:302023-12-07T14:15:23+5:30
WhatsApp आता आणखी एक कमाल फीचर जारी करत आहे, ज्यानंतर तुम्ही व्हिडीओ कॉल दरम्यान स्क्रीन शेअरिंगसह ऑडिओ म्युझिक शेअर करू शकाल.
WhatsApp हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. आपल्या युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं म्हणून WhatsApp सतत नवनवीन फीचर्स आणत असतं. WhatsApp ने काही महिन्यांपूर्वीच व्हिडीओ कॉल दरम्यान स्क्रीन शेअरिंगचे फीचर आणले होते, त्यानंतर गुगल मीट आणि झूमप्रमाणे युजर्स व्हिडीओ कॉल दरम्यान स्क्रीन शेअर करू शकतात.
WhatsApp आता आणखी एक कमाल फीचर जारी करत आहे, ज्यानंतर तुम्ही व्हिडीओ कॉल दरम्यान स्क्रीन शेअरिंगसह ऑडिओ म्युझिक शेअर करू शकाल. हे नवीन फीचर WhatsApp च्या iOS बीटा व्हर्जन 23.25.10.72 वर दिसलं आहे. सध्या हे फीचर टेस्टिंग मोडमध्ये आहे.
WABetaInfo ने याबाबत माहिती दिली आहे. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की हे फीचर आयफोन युजर्ससाठी सर्वात आधी जारी केले जाईल. हे फीचर आल्यानंतर, आयफोन युजर्स व्हिडीओ कॉल दरम्यान स्क्रीन आणि ऑडिओ म्युझिक देखील शेअर करू शकतील.
याचा फायदा असा होईल की, स्क्रीन शेअरिंग दरम्यान युजर्स व्हिडीओ कॉलवर म्युझिक देखील ऐकू शकतील. या फीचरबाबत रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, हे फीचर व्हॉईस कॉलवर काम करणार नाही. याशिवाय, व्हिडीओ कॉल दरम्यान व्हिडीओ डिसेबल केला तर हे फीचर काम करणार नाही.
WhatsApp ने या वर्षी ऑगस्टमध्ये व्हिडीओ कॉल दरम्यान स्क्रीन शेअरिंगचे फिचर जारी केले होते. WhatsApp हळूहळू मुख्य प्रवाहातील व्हिडीओ कॉलिंग प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि झूमशी स्पर्धा करण्यासाठी तयार होत आहे.